Nobel Peace Price: डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांततेचा पुरस्कार

Nobel Peace Prize: व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळालाय. डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळाले आहे.
Nobel Peace Prize
Donald Trump’s Nobel Peace Prize dream shattered as María Corina Machado wins the 2025 award.saam tv
Published On
Summary
  • नोबेल शांतता पुरस्कार २०२५ मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला आहे.

  • डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्न भंग झाले.

  • ट्रम्प यांनी जगातील युद्ध थांबवल्याचा दावा करत नोबेल मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे स्वप्न भंग पावले आहे. कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालाय. दरम्यान शांततेचा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला होता. जगातील सर्वात मोठं युद्ध आपण थांबवली आहेत. भारत-पाकिस्तानासह जगभरातील सात युद्ध थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळे आपल्यालाच शांततेचा नोबेल मिळावा, असा हट्टहास त्यांनी धरला होता.

Nobel Peace Prize
America: जगाला टॅरिफचा धसका दाखवणारे ट्रम्पच अडचणीत, अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर, Moody's चा दावा

इतकेच नाही तर जगातील अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांनी आपली वा,वा करून घेतली होती. डोनाल्ड ट्रम्प कसे शांततेच्या नोबेलसाठी दावेदार आहेत, याची बतावणी करण्यास ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं होतं. यात पाकिस्तानचं नाव आघाडीवर आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी तर अमेरिकेत जाऊन ट्रम्प हेच शांततेच्या नोबेलसाठी प्रबळ दावेदार असल्याच म्हटलं होतं.

Nobel Peace Prize
Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

यावर्षाचा शांततेचा पुरस्कार व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आलाय. दरम्यान पुरस्कराची घोषणा करताना समितीकडून सांगण्यात आलंय की, आम्ही नेहमी शूर लोकांचा सन्मान केलाय. जे लोक नेहमीच दडपशाहीविरुद्ध उभे राहिलेत. स्वातंत्र्यासाठी लढत राहिलेत. गेल्या वर्षी माचाडो यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी लपून बसावे लागले होते, परंतु तरीही त्याने आपल्या देशातच राहणे पसंत केले, होतं असं समितीनं म्हटलंय.

ट्रम्प यांना नोबेल मिळावं, यासाठी आठ देशांनी नामांकन केलं होतं. पाकिस्तान, इस्रायलसह अमेरिका, आर्मेनिया, अजरबैझान, माल्टा, कंबोडिया सारख्या देशानी ट्रम्प यांना नोबेल मिळावा यासाठी नामांकन केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com