
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे संपूर्ण जगभरात परिणाम झाला आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. टॅरिफचा भारतावर जास्त परिणाम झाला आहे. भारताला चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, आता अमेरिकेला धक्का देणारा एक अहवाल समोर आला आहे. Moody’s ने आपल्या अहवालात अमेरिकेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
जागतिक रेटिंग एजन्सी Moody’s ने अमेरिकेला धक्का दिला आहे. मूडीजने अहवालात सांगितलंय की, अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर आहे. या धक्कादायक माहितीने जगभरात खळबल उडाली आहे. अमेरिकेच्या एक तृतीयांशी अर्थव्यवस्थेला आधीच मंदीचा समना करावा लागत आहे. मूडीच अॅनालिटिक्सचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मार्क झांडी यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे.
त्यांनी अहवालात म्हटलंय की, राज्यस्तरीय डेटा दर्शवतोय की, अमेरिकन अर्थव्यवस्था महामंदीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी म्हटलंय की, सध्या अमेरिकेच्या देशांतर्गंत उत्पादनाच्या म्हणजेच जीडीपीच्या एक तृतीयांश वाटा असलेली सर्व राज्य मंदीच्या विळख्यात अडकली आहेत.
ऑगस्ट २०२५ पर्यंत अमेरिकेचे उत्पादन पीएमआय ४८.७ पर्यंत खालीआला आहे. तसेच अमेरिकेच्या कारखान्यांची परिस्थिती अमेरिकेच्या महामंदीच्या काळापेक्षाही वाट असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, एकीकडे अमेरिका इतर राष्ट्रावर टॅरिफ लावत आहे तर दुसरीकडे अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण झाली.
देशातील कारखान्यांना ट्रम्म यांच्या आयात शुल्काचे परिणाम सहन करावे लागत आहे. म्हणजेच टॅरिफ हा अमेरिकेसाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.