Lockdown : घाबरू नका, देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, सरकारकडून महत्त्वाची अपडेट

lockdown rumours News Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अफवांमुळे पेट्रोल पंपावर गर्दी वाढली असताना सरकारने स्पष्ट केलं. देशात मुबलक इंधन साठा, घाबरण्याची गरज नाही असे सांगितले आहे.
lockdown rumours News Update
lockdown rumours News Updateसाम टीव्ही मराठी
Published On

Lockdown News India : देशात पुन्हा लॉक़डाऊन लागण्याची चर्चा जोर धरतेय.. लोकं पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत... मात्र खरंच देशात लॉकडाऊन लागणार आहे का? लॉकडाऊनच्या चर्चेवर विरोधकांनी काय म्हटलंय...? आणि विरोधकांच्या आरोपावर सरकारने काय उत्तर दिलंय.?.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

लॉकडाऊन... हा शब्द ऐकला तरी धडकी भरते आणि कोरोनाच्या भयावह आठवणी डोकं वर काढतात... आता पुन्हा एकदा लॉकडाऊनबाबत चर्चांना उधाण आलाय.. आणि त्याला कारण ठरलंय पंतप्रधान मोदींनी सद्य युध्दपरिस्थितीबाबत संसदेत बोलताना कोरोनाबाबत केलेलं वक्तव्य...

याच वक्तव्यानंतर देशात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं...छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोलीच नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोलसाठी गर्दी केलीय....

हीच भीषण गर्दी पाहून संजय राऊतांनीही पुन्हा देशात लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली सुरु असल्याची शक्यता व्यक्त केली आणि देशात खळबळ उडालीय..

lockdown rumours News Update
Accident : देव दर्शनाहून येताना काळाचा घाला, पिकअपचा चेंदामेंदा, ८ भाविकांचा जागेवरच मृत्यू

एका बाजूला विरोधकांनी लॉकडाऊनची भीती व्यक्त केलीय.. तर दुसरीकडे सरकारने देशात 60 दिवसांचा पेट्रोल आणि डिझेलचा तर महिनाभराचा गॅस साठा असल्याचं स्पष्ट केलंय. अमेरिका इराण युद्धानंतर भारतानं रशियाकडून तेल खरेदीत 82 टक्के वाढ केलीय.. तर अमेरिकेनं निर्बंध हटवल्यानं इराणचंही तेल भारतात दाखल होण्याची शक्यता आहे..एवढंच नाही तर होर्मुझमधून इराण भारताला तेल पुरवठ्याबाबत मदत करायला तयाक झालय. याबरोबरच टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं प्रत्येक कुटुंबाला 3 लीटर केरोसिन देण्याचा निर्णय घेतलाय.

lockdown rumours News Update
Pune : पुण्यात खळबळ! लाच घेताना प्रांताधिकारी शिंदे यांना बेड्या, लिपिकही जाळ्यात; नेमकं काय घडलं?

एका बाजूला सरकारच्या उपाययोजना सुरु असल्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊनच्या चर्चांना ऊत आलाय.. त्यामुळे अखेर केंद्र सरकारनेच लॉकडाऊनच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.... एवढंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांनी लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिलेत..

सरकारने लॉकडाऊनच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी लॉकडाऊनची भीती निर्माण करत अनेक पेट्रोल पंपचालकांनी साठेबाजी केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे लोकांमधील भीती कमी करण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.

lockdown rumours News Update
कामाची बातमी! अतिक्रमणं करून बांधलेली घरं नियमित होणार, पण...फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com