

पश्चिम आशियात तणावजन्य परिस्थिती पुन्हा सुरू
भारतासह जगभरातील देशात उडाला महागाईचा भडका
लॉकडाऊन लागणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी फेटाळून लावला
पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. पंतप्रधान मोदींनीही सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केलं आहे. तसेच इंधन बचतीचा सल्ला दिला आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुन्या वक्तव्यावरून भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरू लागल्या आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री किरेन रिजूजू यांनी लॉकडाऊनचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
केंद्र सरकारकडून भारतात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची घोषणा होणार नाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि हरदीप सिंह यांच्यासहित इतर वरिष्ठ नेत्यांनी देखील सोशल मीडियावर व्हायरल होणारे लॉकडाऊनचे दावे फेटाळून लावले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी केलं आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणाचा चुकीचा अर्थ लावून सोशल मीडियावर लॉकडाऊनची अफवा पसरायला सुरुवात झाली. इंधनाच्या तुटवड्यावरून भाष्य करताना कोरोना काळाची आठवण करून दिली होती. खरंतर त्यांनी भारताच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना उदाहरण देताना कोरोना काळाची आठवण करून दिली होती. मात्र, सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा अर्धवट व्हिडिओ सादर करून लॉकडाऊनची अफवा पसरवली जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की, 'देशात लॉकडाऊन लागणार नाही. सोशल मीडियावरील लॉकडाऊनचा दावा खोटा आहे'. सरकारने स्पष्ट केलं की, भारतात स्थिती सामान्य आहे. लोकांनी अफवांना बळी पडू नये. पडताळणी केल्यानंतर लॉकडाऊनविषयीचे दावे खोटे निघाले आहेत. सोशल मीडियावरील लॉकडाऊनचे सर्व दावे खोटे आहेत. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असंही सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.