Nigeria Terror Attack : नरसंहार! रक्ताच्या नद्या वाहिल्या; दहशतवाद्यांनी १६२ जणांना संपवलं, क्रूरतेने जग हादरलं

Nigeria Terror Attack 162 Killed Update : पश्चिम नायजेरियातील क्वारा राज्यात आयएसशी संलग्न लकुरावा गटाने केलेल्या भीषण हल्ल्यात १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला नायजेरियातील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे.
Nigeria Terror Attack : नरसंहार! रक्ताच्या नद्या वाहिल्या; दहशतवाद्यांनी १६२ जणांना संपवलं, क्रूरतेने जग हादरलं
Nigeria Terror Attack 162 Killed UpdateSaam tv
Published On
Summary
  • क्वारा राज्यातील दोन गावांवर अतिरेक्यांचा भीषण हल्ला

  • अंदाधुंद गोळीबार व घरांना आग; संपूर्ण कुटुंबे ठार

  • मृतांचा आकडा १६२ वर

  • नायजेरियात अतिरेकी हिंसाचार आणि सुरक्षा संकट वाढत असल्याचे चित्र

पश्चिम नायजेरियातील क्वारा राज्यात, अतिरेक्यांनी दोन गावांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात १६२ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला आयएसशी संलग्न असलेल्या लकुरावा गटाने केला आहे. तर दुसरीकडे डोमा गावात अतिरेक्यांनी १३ जणांची हत्या केली. हा हल्ला अलिकडच्या काही महिन्यांतील नायजेरियातील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक मानला जातो, असे या प्रदेशाचे संसद सदस्य मोहम्मद ओमर बायो यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी क्वारा राज्यातील वोरोन आणि नुकू या गावांमध्ये हा हल्ला झाला. मोहम्मद ओमर बायो यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी गावात घुसून अंदाधुंद गोळीबार केला, घरांना आग लावली आणि संपूर्ण कुटुंबांना ठार मारले. हा हल्ला लकुरावा नावाच्या सशस्त्र गटाने केला होता, जो इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेशी जोडलेला असल्याचे म्हटले जाते.

Nigeria Terror Attack : नरसंहार! रक्ताच्या नद्या वाहिल्या; दहशतवाद्यांनी १६२ जणांना संपवलं, क्रूरतेने जग हादरलं
Accident News : धुक्याने घात केला! प्रवाशांनी भरलेल्या बसचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, २६ जखमी

रेड क्रॉसचे क्वारा राज्य सचिव अयोदेजी इमॅन्युएल बाबामो यांनी सुरुवातीला या हल्ल्यात काही जण मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली. मात्र एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की मृतांची संख्या वाढली असून १६२ वर पोहोचली आहे. रेड क्रॉसने असेही म्हटले आहे की, संस्थेच्या मदत पथकांना तेथील दुर्गम गावांपर्यंत पोहोचता आलेले नाही. ही गावे राज्याच्या राजधानीपासून सुमारे आठ तासांच्या अंतरावर आणि बेनिन सीमेजवळ आहेत.

Nigeria Terror Attack : नरसंहार! रक्ताच्या नद्या वाहिल्या; दहशतवाद्यांनी १६२ जणांना संपवलं, क्रूरतेने जग हादरलं
Kokan Railway News : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? मुंबईतून विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक काय? तिकीट बुकिंग कधी करता येणार?

नायजेरिया सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. देशाच्या ईशान्य भागात इस्लामिक अतिरेक्यांकडून बऱ्याच दिवसापासून बंडखोरी सुरू आहे. वायव्य आणि उत्तर-मध्य भागात अपहरण, खंडणीची मागणी आणि सामूहिक हत्याकांडात झपाट्याने वाढ झाली आहे. एका वेगळ्या घटनेत, वायव्य राज्यातील कात्सिना येथील डोमा गावात अतिरेक्यांनी १३ जणांची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की हल्ल्याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com