बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

nia deputy sp accident : उत्तर प्रदेशमध्ये बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
nia deputy sp accident
road accident Saam tv
Published On
Summary

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भीषण अपघात

राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा मृत्यू

उपअधीक्षकांच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कटघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. या अपघातात राष्ट्रीय तपास संस्थेचे उपअधीक्षकांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली महिला देखील जखमी झाली. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने कंटेनरला धडक दिल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात आलं आहे.

nia deputy sp accident
एकाच गावातील ८ मित्रांचा मृत्यू; भरधाव कार थेट १८०० फूट खोल दरीत कोसळली, थरकाप उडवणारा अपघात कसा झाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहालीत राहणारे राष्ट्रीय तपास संस्थेचे ३२ वर्षीय उपअधीक्षक ईशान मेहरा हे मैत्रीण पूनम यांच्यासोबत दुचाकीने दिल्लीहून बाजपूरला निघाले होते. दोघे दुचाकीवरून जवळपास रात्री साडे अकराच्या सुमारास कटघर पोलीस स्टेशनच्या देवापूर गावातून जात होते. त्यावेळी दुचाकी थेट महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरने ईशान मेहरा यांना मृत घोषित केले. तर पूनम यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक कुमार रणविजय सिंह यांनी सांगितलं की, ईशान मेहरा हे दिल्ली एनआयए ऑफिसमध्ये उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दिला जाईल. पोलिसांनी अपघातामागील कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

nia deputy sp accident
भीषण अपघाताचा थरार; ४ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ जणांचा जागीच मृत्यू

तत्पूर्वी, गंगा महामार्गावर महिनाभरात १५ अपघात झाले. मेरठ ते प्रयागराजपर्यंत ५९४ किलोमीटर अंतराचा गंगा महामार्ग २९ मे रोजी सुरू झाला. या महामार्गावर ३० दिवसांत जवळपास १५ अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com