Viral Video: अरे काय हे? टक्कल पडलंय पण रोमान्स तरूणांना लाजवले असा; तरुणीला उचलून गल्लीत गुलूगुलू; किस करून...

Elderly Man in Romantic Tryst with Young Woman: या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध पुरूष तरूण महिलेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत.
Viral
ViralSaam
Published On

खरंतर प्रेम कधीही रंग, रूप किंवा वय पाहून केले जात नाही. पण सध्या याविरूद्ध जाऊन लग्न किंवा प्रेमसंबंध ठेवल्यास आपल्याला ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात. व्हिडिओ म्हणा किंवा फोटो, कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. पण अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध पुरूष तरूण महिलेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. एका गल्लीमध्ये एक तरूणी कुणाची तरी वाट पाहत उभी आहे. तेवढ्यात एक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी येतो. त्या वयस्कर व्यक्तीला पाहून तरूणी खूश होते. त्यानंतर ती थेट त्याला मिठी मारते. मिठी मारल्यानंतर वृद्ध व्यक्ती तिला चक्क तिला उचलून घेतो. नंतर वृद्ध व्यक्ती तरूणीला दुचाकीवर बसवतो. त्यानंतर गुडघ्यावर बसतो.

Viral
Beed: "आम्ही सरपंचाला उद्या उचलतो..", संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी 'डर्टी प्लॅन', घुले अन् चाटेच्या डोक्यात नेमकं काय शिजत होतं?

गुडघ्यावर तरूणीशी गप्पा मारतो. तरूणी उठून पुन्हा वृद्ध व्यक्तीला मिठी मारते. त्यानंतर वृद्ध व्यक्ती तरूणीला उचलून घेतो. इतक्यात हा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कुणीतरी पाणी ओतते. त्यानंतर दोघेही पाहतात आणि तेथून पळ काढतात. हा व्हिडिओ एकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Viral
Dharashiv: प्रायव्हेट फोटो अन् ब्लॅकमेल, कळंब हत्या प्रकरणातील महिलेचा मृत्यू अनैतिक संबंध आणि..

अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये 'तरूणीला एखादा तरूण भेटला नाही का?', तर, दुसऱ्याने 'म्हातारा जरा जास्तच चालू दिसत आहे', तर आणखी एका नेटकऱ्याने 'काय, वेड्याचा बाजार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com