

नेपाळमधील महापुरात 288 भारतीय नागरिक बेपत्ता
नेपाळमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली
चितवन, पूर्व नवलपरासी, धाडिंग, गोरखा यांसह अनेक भागांमध्ये मोठी जीवितहानी
नेपाळमधील पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झालाय. तर 1,000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, सापडलेल्या मृतदेहांमध्ये चितवनमधील 108, पूर्व नवलपरासीमधील 62, धाडिंगमधील 27, गोरख्यामधील 20, रसुवामधील 17, पश्चिम नवलपरासीमधील 15, नुवाकोटमधील 12 आणि तनहुनमधील नऊ जणांचा समावेश आहे. दरम्यान नेपाळमधील या पुरात 288 भारतीय नागरिकही बेपत्ता झालेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी काल नेपाळच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. भारत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांना सांगितले. नेपाळमधील पूरपरिस्थिती लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयात 24 तास कार्यरत राहणारे (24x7) एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
दूरध्वनी क्रमांक:
+91 11 2308 8718
+91 11 2308 8719
व्हॉट्सॲप (WhatsApp) कॉल/मेसेजसाठी: +919968291988
ई-मेल: situationroom@mea.gov.in
काठमांडू येथील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत: (या क्रमांकांवर व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क साधता येईल)
+977 985 131 6807
+977 970 910 7500
+977 981 032 6117
पर्यटक पोलीस: +977 9851289445
नेपाळ लष्कर: +977 9851072914 (ईमेल: dgmi-foreign@inepalarmy.mil.np)
NDRRMA: +977 9851320269 / +977 9849281097 / NDRRMA_Nepal
रसुवा पोलीस: +977 9851254960
सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी, रसुवा: +977 9851164422
नुवाकोट पोलीस: +977 9851282380
सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी, नुवाकोट: +977 9851248777
धाडिंग पोलीस: +977 9851229860
मुख्य जिल्हा अधिकारी, धाडिंग: +977 9851247777
चितवन पोलीस: +977 9855013999
सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी, चितवन: +977 9855088891
त्रिशुलीमध्ये कार्यरत असलेले 73 लोक
तमिळनाडूतील दोन स्वतंत्र गट—ज्यांत अनुक्रमे 37 आणि 49 व्यक्तींचा समावेश होता. ते कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते आणि ते बेपत्ता आहेत.
पश्चिम बंगालमधील 32 लोक
केरळमधील 33 लोक
दरम्यान महाराष्ट्रातील सुमारे 80 पर्यटक नेपाळला गेल्याची माहिती आहे. यापैकी आतापर्यंत केवळ चार जणांशी संपर्क होऊ शकला आहे. ते सुरक्षित असल्याचं समोर आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.