Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

Nepal Protest News: नेपाळमध्ये सोशल मीडियावर २६ प्लॅटफॉर्मवरील बंदी घातल्यामुळे तरुणांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं. पोलिसांच्या गोळीबारात २१ लोकांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जखमी झाले. ओली देश सोडून दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
Nepal Social Media Ban Update
Angry youth set fire to ministers’ houses in Kathmandu as Nepal plunges into political chaos after social media ban.
Published On
Summary
  • नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुणांचा उद्रेक झाला.

  • आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली; गोळीबारात २१ जण ठार, ३०० हून अधिक जखमी झाले.

  • परिस्थिती गंभीर होताच गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह १० मंत्र्यांनी राजीनामा दिला.

  • संतप्त जमावाने माजी मंत्री आणि काँग्रेस अध्यक्षांच्या घरांना आग लावली.

  • राष्ट्रपतींच्या खासगी घरावर आंदोलकांनी कब्जा केला

  • देश पेटल्याने पंतप्रधान ओली देश सोडण्याच्या तयारीत आहेत.

Nepal Social Media Ban Update : एक्स, फेसबुक अन् इन्स्टाग्रामसारख्या २६ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली अन् नेपाळमधील तरूणाचा उद्रेक झाला. संतप्त झालेले Gen Z रस्त्यावर उतरले अन् आपला विरोध दर्शवला. संतप्त झालेल्या तरूणांकडून संसदेला घेराव घालण्यात आला, त्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई केल्यानंतर तरूणाई आणखी आक्रमक झाली. त्यांचा उद्रेक उडाला. काठमांडूसह इतर शहरात जाळपोळ, तोडफोडी घटनांनी नेपाळ पेटलं. हजारो युवक रस्त्यावर उतरले. तरूणांचा उद्रेक पाहून नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली. पण तरूणांचा उद्रेक काही थांबला नाही. तरूणांकडून दुसऱ्या दिवशी आणखी आक्रमक पवित्रा घेण्यात आली. संतप्त जमावाने माजी मंत्र्याचे घर पेटवलं. राष्ट्रपती भवनावरही कब्जा केला आहे. या घडामोडी घडत असताना नेपाळच्या गृहमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्‍यांसह आतापर्यंत १० जदणांनी राजीनामा दिला. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत आहेत. (Nepal protests turn violent after social media ban)

पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत -

देशातील तरूणाचा उद्रेकानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली देश सोडण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. नेपाळी मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, केपी शर्मा दुबाईला जाण्याच्या तयारीत आहे. उपचारासाठी शर्मा देश सोडत आहेत, पण त्यांच्या वेळेमुळे तर्कवितर्क लावले जात आहे. नेपाळमध्ये तरूणांचा उद्रेक उडाला, हिंसाचार भडकला असताना पंतप्रधान देशाबाहर जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केपी शर्मा देशाबाहेर जाण्याचा प्लॅन करत आहेत. त्यांनी खासगी प्लेनही तयार ठेवलेय. ते कोणत्याही क्षणी देश सोडू शकतात.

Nepal Social Media Ban Update
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन पेटलं

१० मंत्र्यांचा राजीनामा -

सोमवारी रात्री नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली. त्यामुळे आंदोलन शांत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण नेपाळमधील तरूणाई दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरली. काठमांडू आणि आजूबाजूच्या शहरातील जमाव हिंसक झाला होता. दोन दिवसांतील परिस्थितीमुळे नेपाळमधील दहा मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये गृहमत्री, आरोग्य मंत्री यांनीही राजीनामा दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

काँग्रेस अध्यक्षांचे घर पेटवले -

नेपाळमधील रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी आंदोलक आणखी उग्र झाले. त्यांनी माजी मंत्र्यांचे घर पेटवलेच. काँग्रेसच अध्यक्षांच्या घरातही आग लावली. केपी शर्मा ओली यांच्या सरकारला काँग्रेसचे समर्थन होते. त्यामुळे संतापलेल्या तरूणाईने अनेक नेत्यांची घरे पेटवली आहेत.

Nepal Social Media Ban Update
ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

नेपाळमध्ये जेव्हापासून लोकशाही आली, तेव्हापासून आतापर्यंत एकाही पंतप्रधानांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्याशिवाय कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. केपी शर्मा यांचे सरकार काँग्रेस अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांच्या पाठिंब्यावर उभं होतं. आंदोलनकर्त्यानी काँग्रेस अध्यक्षांचे घर पेटवलं. हिंसक जमाव पाहून आता पंतप्रधानही देश सोडण्याच्या तयारीत आहेत. इतकेच नाही तर नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांच्या खासगी घरावरही कब्जा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com