गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन पेटलं

Nepal social media ban : काठमांडूमध्ये उग्र झालेलं Gen-Z आंदोलन मागे घेण्यात आलेय. सोमवारी पोलिस गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी हटवली आहे.
Nepal Gen Z protest
Nepal Gen Z protest
Published On
Summary
  • नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधात मोठं आंदोलन

  • आंदोलनादरम्यान पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला,

  • यात २१ जणांचा मृत्यू आणि ३०० हून अधिक जखमी झाले.

  • या हिंसाचारानंतर गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला.

Nepal Gen Z protest : सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे नेपाळमध्ये सोमवारी Gen-Z ने हिंसक प्रदर्शन केले. संतापलेला तरूणांचा जमाव थेट संसदेतही घुसला होता. नेपाळ पोलिसाकडून आंदोलनकर्त्यांना आडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. नेपाळमध्ये झालेल्या या आंदोलानत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तक ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आह. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी या दुर्देवी घटनेबाबात दुख व्यक्त केले आहे. त्याशिवाय नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी त्यांनी मागे घेतली आहे. २१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे नेपाळच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलाय. Why did Nepal ban social media 2025?

सोशल मिडिया वापरावरील बंदीच्या विरोधात सोमवारी नेपाळमधील तरूणांनी हिंसक आंदोलन केले. त्यानंतर काठमांडू आणि आजूबाजूच्या शहरातील स्थिती अतिशय बिघडली. पोलिसांकडून प्रदर्शन आटोक्यात आणण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी गोळीबारही केला. यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ३०० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. जखमींवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या सर्व संतापजनक घटनेनंतर गृहमंत्री रमेश लेखक यांनी जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी नेपाळमध्ये मृत्यू झालेल्यांबद्दल दुखः व्यक्त केले. ते म्हणाले की शांततापूर्ण निदर्शनांमध्ये ‘काही लोकांच्या घुसखोरी’मुळे हिंसा भडकली. सरकारला सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. त्यांनी सांगितले की सरकारचा उद्देश सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालणे नसून त्यांचे नियमन करणे आहे. तसेच, त्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करणारी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणाही केली.

Nepal Gen Z protest
MHADA Homes : म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त २७ लाखांत स्वप्नातील घर, प्राईम लोकेशन कोणतं? वाचा

सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली ?

‘Gen-Z’ च्या हिंसक आंदोलनानंतर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती व प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, नेपाळ सरकारने सोशल मीडिया बंदी मागे घेतली आहे. संबंधित यंत्रणांना प्लॅटफॉर्म्स पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिलेत. ‘Gen-Z’ ने निर्दशने थांबवावे.

Nepal Gen Z protest
Raigad Politics: आदिती तटकरे-भरत गोगावले खुर्चीला खुर्ची लावून बसले, कानात कुजबुजले, पालकमंत्रिपदाचा वाद मिटला?

सोमवारी काठमांडूमध्ये संसदेसमोर हजारो तरुण जमले होते. त्यामध्ये शालेय विद्यार्थीही सामील होते. त्यांनी मोठे निदर्शन केले आणि सरकारविरोधी घोषणा दिल्या. काही निदर्शक संसद परिसरात घुसले. त्यामुळे पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी वॉटर कॅनन, अश्रुधूर आणि रबर बुलेट्सचा वापर केला होता. पोलिसांनी गोळीबारही केला होता. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com