MHADA Homes : म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त २७ लाखांत स्वप्नातील घर, प्राईम लोकेशन कोणतं? वाचा

MHADA Lottery : नाशिक MHADA लॉटरी 2025: गंगापुर, देवळाली, पाथर्डी, म्हसरूल या ठिकाणी 15.5 ते 27 लाखांपर्यंत परवडणारी घरे. 4 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन अर्ज करा. सोडत 17 ऑक्टोबर रोजी!
MHADA lottery
MHADA lotterysaam tv
Published On
Summary
  • फ्लॅट्स व लोकेशन – नाशिकमधील ६ ठिकाणी एकूण ४७८ फ्लॅट्ससाठी लॉटरी जाहीर.

  • किंमत – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांच्या किंमती १५.५१ लाख ते २७ लाख रुपयांदरम्यान

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – ४ सप्टेंबरपासून अर्ज सुरू, अंतिम तारीख ३ ऑक्टोबर रात्री ११.५९ पर्यंत.

  • सोडतीची तारीख – लॉटरीचा निकाल १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता म्हाडा संकेतस्थळावर जाहीर होणार

Nashik MHADA Lottery Update : नाशिकमध्ये प्राईम लोकेशनवर स्वप्नातील घर घ्यायचा विचार करताय? आता हे स्वप्न लवकरच स्वप्न सत्यात उतरणार आहे. नाशिकमध्ये म्हाडाने फ्लॅट, दुकानं आणि गाळ्यासाठी लॉटरी काढली आहे. नाशिकमधील ६ ठिकाणावर ४७८ फ्लॅट्ससाठी म्हाडाकडून लॉटरी मागवण्यात आली आहे. ४ सप्टेंबरपासून नाशिक म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ३ ऑक्टोंबरपर्यंत घरासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. पंतप्रधान आवास योजनाअंतर्गत ही घराची लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील. (MHADA Nashik lottery 2025 online application process)

https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आलेय. इतर कोणत्याही संकेतस्थळावरून अथवा एजेंटकडून लॉटरीसाठी अर्ज केल्यास सावध राहावे, असे आवाहनही म्हाडाकडून करण्यात आलेय. म्हाडाकडून घराच्या वितराणासाठी कोणताही प्रतिनिधी, सल्लागार अथवा प्रॉपर्टी एजंट नेमण्यात आलेला नाही. घरासाठी अर्ज करणाऱ्यांनी कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नयेत. तसे केल्यास म्हाडा फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे नाशिक म्हडाकडून सांगण्यात आलेय.

MHADA lottery
म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

नाशिकमधील कोणत्या लोकेशनवर किती घरे?

नाशिकध्ये ६ लोकेशनवर म्हाडाकडून लॉटर काढण्यात आली आहे. त्यामध्ये गंगापुर शिवार (50 फ्लॅट), देवळाली शिवार (22फ्लॅट), पाथर्डी शिवार (64फ्लॅट), म्हसरूल शिवार (196फ्लॅट), नाशिकक शिवार (14फ्लॅट) आणि आगर तकली शिवार (132फ्लॅट) उपलब्ध आहेत.

MHADA lottery
Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

म्हाडाच्या घ राची किंमत किती? How to apply for MHADA flats in Nashik prime locations

IHLMS 2.0 ही म्हाडाची संगणकीय प्रणाली अत्यंत पारदर्शक आणि सोपी आहे. घरासाठी इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी याच सोडत प्रणालीच्या सहाय्याने सहभाग घ्यावा. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ अथवा अॅपच्या माध्यमातूनच अर्ज करावा. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. नाशिकमध्ये निघालेले ४७८ फ्लॅट्स विविध वर्गासाठी उपलब्ध आहेत. १५.५१ लाख ते २७ लाख यादमर्यान या घरांची किंमत असेल. नाशिककडून या वर्षातील ही तिसरी लॉटरी काढण्यात आली आहे. याआघी ३७९ फ्लॅट, १०५ दुकाने आणि ३२ फ्लॉटचा समावेश होता.

MHADA lottery
Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

कधीपर्यंत करू शकता अर्ज?

नाशिकमधील म्हाडाच्या घरासाठी ४ सप्टेंबर २०५ रोजी दुपारी एक वाजता अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारेही पैसे भरू शकता. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजता सोडत जाहीर होईल. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीची यादी जाहीर होणार आहे.

MHADA lottery
टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com