Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

why buffalo milk price increased in buldhana : बुलढाण्यात म्हशीच्या दुधाचा दर १० रुपयांनी वाढून ८० रुपये प्रति लिटर झाला; ग्राहकांमध्ये नाराजी. उत्पादन खर्च व बाजारातील मागणी-पुरवठा असमतोलामुळे खाजगी डेअऱ्यांनी दरवाढ लागू केली.
Milk Price Hike
Milk Price HikeSaam Tv
Published On
Summary
  • बुलढाणा शहरात म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ झाली आहे.

  • आता सरासरी दर ₹80/लिटर.

  • दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी, घरगुती खर्चावर थेट परिणाम.

  • दुधाच्या दरावर थेट सरकारी नियंत्रण नाही, पण किमान आधारभूत दर निश्चित करण्याचे अधिकार शासनाकडे.

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

impact of ₹10 hike on household budgets maharashtra : बुलढाणा शहरात म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लीटर दहा रुपयांची वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या वाढीनंतर दूध विक्रेत्यांनी - डेअरी चालकांवर दबाव टाकत प्रति लीटर ८० रुपये दर आकारण्यास सुरुवात केली आहे. दूध उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि बाजारातील परिस्थिती यामुळे दरवाढ र करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे; मात्र त्याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. त्यामुळे दूधदरवाढीच्या निर्णयावर - मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे घरगुती खर्चात वाढ होणार आहे. त्यातच दूध भेसळीचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील निवृत्त दुग्धविकास अधिकान्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या संदर्भातील अनेक बाबी स्पष्ट केल्या.

बुलढाणा जिल्ह्यात एकूण ५७ दुग्ध विकास सहकारी संस्था आहेत. त्यापैकी २४ संस्थांचे कामकाज बंद असल्याने अवसायनात काढण्यात आलेल्या आहेत. उर्वरित संस्थांना दुग्ध संकलनही नगण्य आहे. सहकारी दूध उत्पादक संघ एकही नाही. जिल्ह्यात शासकीय दूध खरेदी बंद आहे.

Milk Price Hike
टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

दुधाच्या दरावर थेट कोणाचेही नियंत्रण नसते; परंतु सरकारी धोरणे आणि बाजारपेठेतील मागणी-पुरवठा यावर दरांचे नियंत्रण अवलंबून असते. शासन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी किमान आधारभूत दर निश्चित करू शकते, तर खासगी डेअरी फार्म्स आणि सहकारी संस्था बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार दरांवर परिणाम करतात.

Milk Price Hike
Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

बुलढाणा शहरात ४० ते ५० डेअरी आहेत, तेथे दररोज मोठ्या प्रमाणात दूध विक्री केले आते. शहर आणि आजूबाजूच्या खेडेगावातील शेतकरी व दूध उत्पादक या डेअरींवर दूध विक्रीसाठी आणतात. डेअरींमध्ये म्हशीच्या दुधाची विक्री केली जात आहे.

Milk Price Hike
Drug Factory : आतापर्यंतची सर्वात मोठी रेड, तब्बल १२००० कोटींचे ड्रग्ज जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com