वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! NEET PG परीक्षेत 5 महत्त्वाचे बदल; जाणून घ्या नवे नियम...

NEET PG 2026 Exam Pattern Changes And New Rules Explained: NEET PG 2026 परीक्षेत मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षा पॅटर्न, शहर निवड, सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शकतेसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती जाणून घ्या.
NEET PG 2026 exam pattern changes and new rules explained
NEET PG 2026 exam pattern changes and new rules explainedsaam tv
Published On

NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षेपूर्वी अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार परीक्षा देण्यासाठी शहरांची निवड करता येणार आहे आणि परीक्षा केंद्रांची माहिती त्यांना परीक्षेच्या आधी तीन आठवडे आधीच मिळणार आहे. तसेच परीक्षा प्रक्रिया आधिक सोयीस्कर आणि पारदर्शक करण्यासाठी इतरही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

NEET ची यंदाची परीक्षा 30 ऑगस्ट रोजी होणार असून यावेळी 2.73 लाखांहून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 12.5 टक्क्यांनी अधिक आहे. परीक्षा सुरक्षित आणि निष्पक्ष पार पडावी यासाठी अनेक स्तरांवर सुरक्षा व्यवस्था लागू केली जाणार आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची पूर्वतपासणी, सीसीटीव्ही देखरेख, बायोमेट्रिक पडताळणी, उमेदवारांची तपासणी, सिग्नल जॅमर, लाईव्ह मॉनिटरिंग आणि स्वतंत्र निरीक्षकांचा समावेश असेल.

NEET PG 2026 exam pattern changes and new rules explained
प्रतिक्षा संपली! NEET UG 2026 चा निकाल जाहीर; आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल देशात पहिले, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

NEET 2026 मधील 5 मोठे बदल

1. घराच्या जवळ परीक्षा केंद्र निवडण्याची सुविधा

आता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी त्यांच्या पसंतीची तीन शहरे निवडता येतील. यामध्ये पत्रव्यवहारच्या राज्याला प्रथम प्राधान्य देणे बंधनकारक असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना लांबच्या शहरात किंवा राज्यात परीक्षा देण्याची गरज भासणार नाही.

2.परीक्षा शहराची माहिती आधीच मिळणार

विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा शहराची माहिती परीक्षेच्या सुमारे तीन आठवडे आधी दिली जाईल. याआधी ही माहिती काही दिवस आधी मिळत असल्याने प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यात अडचणी येत होत्या.

3.परीक्षा पॅटर्नमध्ये बदल

NEET PG 2026 मध्ये आता 180 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारले जातील, जे आधी 200 होते. मात्र, परीक्षेची एकूण वेळ 210 मिनिटेच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

NEET PG 2026 exam pattern changes and new rules explained
Neet Exam: पुण्यात १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या;राहत्या घरात घेतला गळफास

4.एकाच शिफ्टमध्ये परीक्षा

यावेळी NEET PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. सर्व उमेदवारांना समान काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका मिळेल आणि मूल्यमापन प्रक्रिया अधिक पारदर्शी व निष्पक्ष होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.

5.अधिक मजबूत सुरक्षा व्यवस्था

परीक्षेत आधार पडताळणी, बायोमेट्रिक आणि गरज पडल्यास आयरिस स्कॅनचा वापर केला जाईल. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण प्रक्रिया एन्क्रिप्शन आणि सुरक्षित डिजिटल प्रणालीद्वारे संरक्षित असेल. तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 60,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com