मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत आहात किंवा येत्या काही दिवसांत करणार असाल तर, थोडं सतर्क राहाल! कारण रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे या महामार्गावर असलेला उड्डाणपूल धोकादायक झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावरील रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आले होते. आता तर या पुलाचा मातीचा भराव खचत असल्याचे दिसते आहे. साम टीव्हीचे बातमीदार सचिन कदम यांनी या पुलाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला आहे.
पुलाच्या एका बाजूचा जो भाग आहे, त्याला अगदी वरच्या बाजूपर्यंत तडे गेले आहेत. प्लास्टरचा काही भाग बाहेर आला आहे. त्याच्या बाजूलाच मोठे खिळे लावले आहेत. पण तरीही पुलाची प्लास्टर केलेली एका बाजूची भिंत एका लेव्हलला नाही. या पुलासाठी टाकलेला मातीचा भराव खचत असल्याचे दिसते आहे. या पुलाचे काम करणारे ठेकेदार किंवा संबंधित सरकारी विभागाचे अधिकारी यावर तात्पुरती मलमपट्टी करताना दिसून येतात. पण त्यावर कायमस्वरुपी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.