Neet ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय, स्वत:वर गोळी झाडत आयुष्य संपवलं

Shocking : नीट परीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात आत्महत्या केली. त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आयुष्य संपवले. नैराश्यातून त्याने असे केल्याचे म्हटले जात आहे.
Shocking
Shockingx
Published On
Summary
  • नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या.

  • तरुणाने मानसिक ताणामुळे आयुष्य संपवल्याचे पोलिसांचा अंदाज.

  • घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू.

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी तो त्याच्या खोलीत होता. कुटुंबातील सदस्यांना खोलीतून गोळी चालवल्याचा आवाज आला. ते धावत तरुणाच्या खोलीत शिरले. तरुणाचे कुटुंबीय खोलीत पोहोचायच्याआधीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना छत्तीसगडच्या बिलासपूरमधील सरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव संस्कार सिंग असे आहे. संस्कार मागील काही काळापासून मानसिक ताण आणि नैराश्याने ग्रस्त होता. तो नीटची तयारी करण्यात व्यग्र होता असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. मानसिक ताण आणि परीक्षेची चिंता यामुळे संस्कारने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Shocking
मोठी राजकीय उलथापालथ होणार, आगामी निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडीही फुटणार, संकेत मिळाले

घटनेची माहिती मिळताच सरकंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबियांची चौकशी करत त्यांनी तपास सुरु केली. तपासादरम्यान, संस्कारच्या खोलीतून फॉरेन्सिक आणि आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Shocking
Bollywood Actor Arrest : मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्याला अटक, ३५ कोटींचे कोकेन जप्त

तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. संस्कार हा एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी होता. पण अलिकडच्या काही महिन्यात तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसत होता, असे त्याच्या शेजारच्यांनी आणि मित्रांनी सांगितले. परीक्षेचा दबावाचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Shocking
BJP Leader Passes Away : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, एम्स रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com