BJP Leader Passes Away : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, एम्स रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

Vijay Kumar Malhotra : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
Vijay Kumar Malhotra Passes Away
Vijay Kumar Malhotra Passes Away x
Published On
Summary
  • भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे ९४ व्या वर्षी निधन झाले.

  • दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

  • मल्होत्रा यांच्या निधनावर नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Vijay Kumar Malhotra Passes Away : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष प्रा. विजय कुमार मल्होत्रा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय कुमार मल्होत्रा यांचा उल्लेख करत त्याच्या राजकारणातील योगदानाचा आणि सामाजिक सेवेचा गौरव केला होता. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय कुमार मल्होत्रा यांचा जन्म ३ डिसेंबर १९३१ रोजी पंजाबमधील लाहोरमध्ये (आताच्या पाकिस्तान) झाला होता. त्यांचे वडिलांचे नाव कविराज खजान चंद असे होते. विजय कुमार मल्होत्रा हे भारतीय राजकारण आणि क्रीडा प्रशासनातील त्यांच्या प्रतिमेसाठी प्रसिद्ध होते. १९७२-१९७५ या काळात दिल्ली प्रदेश जनता संघाचे अध्यक्षपक्ष त्यांच्याकडे होते. १९७७-१९८०, १९८०-१९८४ या कालावधीमध्ये त्यांन भाजपचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. मल्होत्रा यांच्या योगदानामुळे दिल्लीत भाजपची स्थिती मजबूत झाली होती.

Vijay Kumar Malhotra Passes Away
मोठी राजकीय उलथापालथ होणार, आगामी निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडीही फुटणार, संकेत मिळाले

१९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा विजय ही मल्होत्रा यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी राजकीय कामगिरी मानली जाते. मागील ४५ वर्षांत त्यांनी पाच वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडून येत काम केले होेत. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते दिल्लीतून विजयी होणार भाजपचे एकमेव उमेदवार होते.

Vijay Kumar Malhotra Passes Away
Bollywood Actor Arrest : मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्याला अटक, ३५ कोटींचे कोकेन जप्त

विजय कुमार मल्होत्रा हे फक्त राजकारणातच नाही, तर शिक्षण क्षेत्रातही तज्ज्ञ होते. त्यांनी हिंदी साहित्यात डॉक्टरेट ही पदवी मिळवली होती. ते क्रीडा प्रशासनातही सक्रीय होते. दिल्लीच्या बुद्धिबळ आणि धनुर्विद्या क्लबच्या व्यवस्थापनात सहभागी होते. राजकारण, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Vijay Kumar Malhotra Passes Away
Maharashtra Politics : राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, चंद्रकांत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com