मोठी राजकीय उलथापालथ होणार, आगामी निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडीही फुटणार, संकेत मिळाले

Maharashtra Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धर्तीवर राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra Politics x
Published On
Summary
  • आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता.

  • काँग्रेस, अजित पवार गटासह अनेक पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे संकेत.

  • काही ठिकाणी युती, पण बहुतांश ठिकाणी कालचे मित्र आज विरोधक म्हणून आमनेसामने.

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये फूट पडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये पक्ष एकसंध राहणार नसल्याचे काही नेत्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी गरज भासेल तेव्हाच महायुती, महाविकास आघाडी एकत्र दिसतील. पण बहुतांश ठिकाणी कालचे मित्र आज विरोधक म्हणून आमनेसामने उभे राहतील असे चित्र दिसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपला पक्ष निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी पक्षजनांना सूचना देखील केल्या आहेत. काँग्रेस पक्ष देखील स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. फक्त महाविकास आघाडीच नाहीतर महायुतीतील पक्ष देखील एकमेकांसमोर उभे ठाकतील असे म्हटले जात आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; जिथं निवडून येणार त्याच...

काँग्रेस स्वबळावर लढल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती असल्याने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा आहे. आपण स्वबळावर लढले पाहिजे, तसे केल्यास मोठे यश मिळेलच असे नाही पण त्या निमित्ताने पक्ष प्रत्येक ठिकाणी पोहोचेल अशी काँग्रेसची भूमिका आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, चंद्रकांत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई महापालिकेत महायुती एकत्र असेल, पण ठाण्यात एकत्र दिसण्याची शक्यता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले. पुणे, पिंपरी चिंचवड येथे स्वतंत्र लढण्यावर अजित पवार गट जोर देत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्येही महायुती एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ, मराठवाड्यात भाजपला स्वबळाचे वेध लागले आहेत.

Maharashtra Politics
Tilak Varma : तिलक वर्माचं पाकिस्तानमध्येही तोंडभरून कौतुक, दिग्गजांनी काढली आपल्याच संघाची लाज, वाचा कोण काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com