

Madhya Pradesh Viral News: मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये रामकथेचे आयोजन करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. ही कथा वाचायला आलेल्या कथाकाराच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीला पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित पतीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली.
महिनाभरानंतर तक्रारदाराची पत्नी सापडली, पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून जबाब घेतला. आता महिलेने पतीसोबत राहण्यास नकार देत चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (MP News)
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात रामकथेचे आयोजन केले होते. चित्रकूटचे कथाकार धीरेंद्र आचार्य यांना कथा वाचनासाठी बोलावण्यात आले. आचार्य त्यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे याच्यासोबत रामकथा करण्यासाठी आले होते. कथेदरम्यान नरोत्तम दास दुबे आणि महिलेचे प्रेम जुळले.
रामकथा संपल्यानंतर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघांचे फोनवर बोलणेही सुरू झाले. यानंतर गेल्या महिन्यात 5 एप्रिल रोजी महिला नरोत्तम दास दुबेसोबत पळून गेली. काही दिवसानंतर तिला पोलिसानंतर पोलिसांनी तिला बोलावले. तिने आता पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल न करता तपास करत आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान, या दोघांची प्रेमकथा २०२१ मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर आता महिलेने पतीसोबत राहण्यास नकार दिल्याने बिचाऱ्याला रामकथा आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे. या आगळ्या वेगळ्या लवस्टोरीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.