Peru Gold Mines Incident: भयंकर! पेरूमध्ये सोन्याच्या खाणीत लागली भीषण आग, २७ कामगार होरपळले

Peru Gold Mines Incident: दक्षिण पेरूमधून धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण पेरूमध्ये शनिवारी सोन्याच्या खाणीत आग लागल्याची घटना घडली आहे.
Peru Gold Mines Incident
Peru Gold Mines IncidentSaam tv

Peru Gold Mines Incident: दक्षिण पेरूमधून धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण पेरूमध्ये शनिवारी सोन्याच्या खाणीत आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेमुळे २७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे पेरूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पेरूमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १७५ जणांचे जीव वाचविण्यात यश आलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे सोन्याच्या आग लागल्याची घटना घडली अशी माहिती समोर आली आहे .

Peru Gold Mines Incident
America Mall Shooting : अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, एका भारतीय तरुणीसह ९ जणांचा मृत्यू

एका मीडिया रिपोर्टनुसार, सोन्याच्या खाणीत आग लागली, त्यावेळी कामगार १०० मीटर खोल खाणीत काम करत होते. स्थानिक प्रसारमाध्यमांमधून डोंगरामधून धूर येतानाचे फोटो समोर आले होते.

पीडित व्यक्तींच्या नातेवाईकांना घटनेनंतर बसद्वारे खाणीजवळ आणण्यात आले. तर काही नातेवाईकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

सोन्याच्या खाणीच्या कंपनीचं म्हणणं आहे की, 'या घटनेमुळे आम्ही दु:खी आहोत. कंपनीने कामगारांना प्राथमिक मदत पुरवण्यास मदत सुरू केली आहे. या घटनास्थळापासून पोलिस स्टेशन ९० मिनिटांच्या अंतरावर आहे. तर शहर देखील दूर आहे.

पेरूमधील स्थानिक वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, कामगारांचे नातेवाईक रविवापासून घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र, कामगारांच्या नातेवाईकांना खाणीच्या घटनास्थळी पोहोचण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Peru Gold Mines Incident
India Rail in Saudi Arabia : सौदी अरेबिया आणि युएईमध्ये धावणार भारतीय रेल्वे, चीनला मोठा दणका

पेरू जगातील सर्वाधिक सोन्याचं उत्पादन करणारा देश आहे. शनिवारी घडलेली घटना आतापर्यंत अत्यंत दुर्दैवी असल्याचं बोललं जातं आहे. खाण उद्योगात १२ हून अधिक कामगारांचा मृत्यू होणे ही सामान्य बाब नसल्याचेही बोलले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com