Modi Government : मोदी सरकारचं रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ११.२७ लाख कामगारांना मिळणार दिवाळी बोनस

केंद्रातील भाजप सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीआधीच आनंदाची बातमी दिली आहे.
Diwali Bonus to Railway Employee Latest News
Diwali Bonus to Railway Employee Latest News SAAM TV
Published On

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. दिवाळी भेट म्हणून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ७८ दिवसांचा पगार मिळणार आहे. (Latest Marathi News)

अलीकडेच मोदी सरकारनं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Employee) खूशखबर दिली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर या सरकारने निवृत्ती वेतनधारकांना डीआरमध्ये चार टक्क्यांची वाढ देण्याची घोषणा केली होती.

Diwali Bonus to Railway Employee Latest News
Wardha : गरिबांची दिवाळी गोड; 11 लाख 36 हजार लोकांना मिळणार डिसेंबर पर्यंत धान्य मोफत

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली होती. रेल्वेच्या ११ लाख २७ हजार कर्मचाऱ्यांना एकूण १ लाख ८ हजार ३२ कोटी रुपये म्हणजेच प्रत्येकी ७८ दिवसांचा परफॉर्मन्स लिंक बोनस म्हणजेच दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी अनुराग ठाकूर यांनी अन्य महत्वाच्या घोषणाही केल्या.

DA आणि DR मध्ये वाढीची घोषणा

अलीकडेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चार टक्के डीएमध्ये वाढ करण्याचे जाहीर केले. डीए यापूर्वी ३४ टक्के होता. तो वाढून आता ३८ टक्के करण्यात आला आहे.

दसऱ्याच्या आधी सरकारने एका मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांना वाढलेल्या डीएचा लाभ जुलैपासून मिळणार आहे. त्याचबरोबर निवृत्ती वेतनधारकांनाही चार टक्के डीआर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com