Wardha : गरिबांची दिवाळी गोड; 11 लाख 36 हजार लोकांना मिळणार डिसेंबर पर्यंत धान्य मोफत

सणासुदीच्या दिवसांत लाभार्थ्यांना दिलासा
Wardha News
Wardha NewsSaam Tv
Published On

चेतन व्यास

वर्धा - कोरोनाकाळात (Corona) अनेकांचे रोजगार गेल्याने कुणीही उपाशीपोटी राहू नये म्हणून शासनाने प्रधानमंत्री (PM Modi) अन्न सुरक्षा योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत नियमित धान्यासोबत पाच किलो धान्य मोफत दिले जात आहे. आता या मोफतच्या धान्य वितरणाला आणखी डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या दिवसात अनेकांना दिलासा मिळाला आहे. (Wardha Latest News)

Wardha News
Weather Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये २ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारक असून ११ लाख ३६ हजार ८३६ लाभार्थी आहे. या सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे स्वस्त धान्याचे दर महिन्याला वितरण केले जाते. (Tajya News)

कोरोनाकाळापासून प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनाच नियमित धान्यासोबतच पाच किलो मोफतचे धान्य देण्यास सुरुवात झाली. प्रारंभी पाच किलो तांदूळ मोफत दिले जायचे.परंतु लाभार्थ्यांकडून तांदळाचीc साठवणूक करून त्याची विक्री करण्याचे प्रकार समोर आल्यानंतर शासनाने दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जात आहे.

आता या मोफतच्या धान्य वितरणाकरिता आणखी डिसेंबर महिन्यापर्यंत शासनाने मुदतवाढ दिलीअसून याचा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. मोफतच्या धान्यामध्ये पुन्हा तांदळाचेच वितरण अधिक असल्याने यापेक्षा गहू देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com