मुख्यमंत्र्यांचा आदेश अन् एकाचवेळी तीन बड्या नेत्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Murshidabad Political Controversy Latest Updates: मुर्शिदाबादमध्ये भडकाऊ भाषण प्रकरणात मोठी कारवाई; आम जनता उन्नयन पार्टीचे तीन प्रमुख नेते अटकेत. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Police escort arrested AJUP leaders to court amid rising political tension in Murshidabad.
Police escort arrested AJUP leaders to court amid rising political tension in Murshidabad.saam tv
Published On

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात राजकीय वक्तव्यांवरून वाद अधिकच वाढला आहे. काशीपूर येथे उन्नयन पार्टीचे नेते हुमायु कबीर यांनी केलेल्या भडकाऊ भाषणाविरोधात रेजिनगर आणि शक्तिपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर मुख्यमंत्री सूवेंदु अधिकारी यांनी देखील कारवाईचा इशारा दिला होता. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी आम जनता उन्नयन पार्टीचे तीन प्रमुख नेत्यांना अटक केली आहेत.

Police escort arrested AJUP leaders to court amid rising political tension in Murshidabad.
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीची रिक्षाला धडक; ६ महिलांचा जागीच मृत्यू

अटक करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये पक्षध्यक्ष गोलामा मुस्तफा, उपाध्यक्ष अमिनुल हक आणि युवा अध्यक्ष अनीसुर रहमान यांचा समावेश आहे. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बहारामपूर जिल्हा न्यायालयात हजर केले. मुख्यमंत्री यांच्या वक्तव्यानंतर काशीपूर येथे हुमायूं कबीर यांनी केलेले भाषण सामाजिक तणाव वाढवणारे आणि लोकांना भडकवणारे होते. या प्रकरणाची चौकशी सुरू करून पोलिसांनी ही कारवाई केली.

Police escort arrested AJUP leaders to court amid rising political tension in Murshidabad.
Petrol-Diesel: सरकारकडून पेट्रोल आणि डिझेल खरेदीच्या नियमात बदल, काय आहेत नवीन नियम?

या तिघा नेत्यांच्या अटकेनंतर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम जनता उन्नयन पार्टीच्या समर्थकांनी ही कारवाई राजकीय सूड असल्याचा आरोप केला आहे, तर तक्रारदारांचे म्हणणे आहे की कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणाकडे विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत हा मुद्दा पश्चिम बंगालच्या राजकारणात अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कबीर यांनी स्पष्ट केले की माझी टीका सरकारविरोधात नव्हती, तर विधानसभा निवडणुकीत मुर्शिदाबादमध्ये भाजप उमेदवार आणि त्यांना धमकावणाऱ्या काही लोकांविरोधात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com