Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

Zp Ceo Bungalow Lighting Scam Sambhajinagar: शासकीय कामांमध्ये घोटाळे नवे नाहीत...खालच्या कर्मचाऱ्यांपासून वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच हात बरबटलेले असतात. मात्र झेडपीतले कर्मचारी आणि कंत्राटदारांनी मिळून थेट सीईओंच्या बंगाल्यात कामं केल्याचं दाखवून लाखो रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...कोणत्या झेडपी आणि कसा घडलाय हा घोटाळा पाहूयात या रिपोर्टमधून..........
Alleged scam at Zilla Parishad CEO bungalow where ₹25 lakh lighting work was billed without execution.
Alleged scam at Zilla Parishad CEO bungalow where ₹25 lakh lighting work was billed without execution.saam tv
Published On

शासकीय पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्याचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील....मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अजब आणि संतापजनक घोटाळा समोर आलाय... मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरकारी बंगल्याच्या लायटिंगच्या नावाखाली जिल्हा परिषदेला 25 लाखांचा चुना लावण्यात आलाय...त्यामुळे हा लाईटींग घोटाळा नेमका कसा झाला... पाहूयात..

2 एप्रिल 2026 : मिन्नू पी.एम. यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या CEO म्हणून पदभार स्वीकारला.

7 एप्रिल 2026: पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या 5 दिवसांत, कोणतीही निकड नसताना बांधकाम विभागाकडून सीईओंच्या सरकारी बंगल्यावर लायटिंग आणि दुरुस्तीचे काम मंजुर करून 25 लाखांच्या कामाचे आदेश दिले...

4 मे 2026: काम न करताच अवघ्या महिनाभरात 25 लाख रुपयांचे बिल कंत्राटदाराच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे...

सीईओंच्या बंगल्या सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य नागरिक किंवा इतर कोणीही सहजासहजी तपासणीसाठी जात नाही, याच गोष्टीचा गैरफायदा बांधकाम विभाग आणि कंत्राटदारानं हा महाघोटाळा केल्याचा आरोप आहे.. विशेष म्हणजे, हा केवळ 25 लाखांचा घोटाळा नसून हे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. जिल्हा परिषदेत प्रशासकाचा कालावधी सुरू असताना एकट्या बांधकाम विभागामध्ये झालेली 23 कामे अत्यंत संशयास्पद मानली जातायत...सीईओ बंगल्याच्या धर्तीवरच इतरही अनेक कामे केवळ कागदावरच करून कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याची चर्चा सुरू आहे. या संपूर्ण आर्थिक लुटीचा आकडा तब्बल 12 कोटींच्या घरात असण्याचाही आरोप आहे... त्यामुळे अॅडिशनल सीईओ यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत...

कमिशनखोरीच्या नादात थेट जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या घरालाच भ्रष्टाचाराचे केंद्र बनवण्याचं धाडस कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमध्ये नेमकं आलं कुठून? प्रशासकाच्या काळात झालेल्या 23 संशयास्पद कामांची निष्पक्ष चौकशी होणार का? आणि जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणाऱ्य़ांनी जेलची हवा खायला पाठवणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com