IT कर्मचाऱ्याला बलात्कार प्रकरणात अडकवलं, RBL बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं ब्लॅकमेलिंगचं षडयंत्र

RBL बँकेच्या महिला कर्मचाऱ्याने IT कर्मचाऱ्याविरुद्ध खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड. मुंबईतील चारकोप पोलिसांकडून कारवाई.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV News Marathi
Published On
Summary
  • RBL बँकेच्या डॉली कोटक हिला IT कर्मचाऱ्याला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवल्याबद्दल अटक.

  • पीडित तरुणाकडून १ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न.

  • कोर्टाच्या आदेशानंतर चारकोप पोलिसांनी FIR नोंदवला.

  • आरोपी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या खाजगी माहिती मिळवली.

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime News : चारकोप पोलिसांनी मोठी कारवाई करत RBL बँकेच्या डॉली कोटक या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. तिने आपल्या माजी जोडीदाराविरुद्ध खोटा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्याच्याकडून १ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉली कोटक हिने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या माजी जोडीदाराला जाणीवपूर्वक खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवले. त्यामुळे संबंधित तरुणाला तब्बल महिनाभर तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर कोर्टाच्या आवारात त्या तरुणाच्या बहिणीला धमकावत १ कोटींची मागणी केली आणि "नो ऑब्जेक्शन" स्टेटमेंट देण्याचा सौदा मांडला.

कोटक हिने प्रसारमाध्यमांत बदनामी करण्याचीही धमकी दिली आणि नंतर ती प्रत्यक्षात आणली. या संपूर्ण कालावधीत पीडित तरुणाला अनेकदा फोन करून दबाव टाकण्यात आला. अखेर, वकिलाच्या कार्यालयात भेट घेऊन पुन्हा १ कोटींची मागणी करण्यात आली.

Mumbai Crime News
Pune Ganesh Mandal : वेळ सकाळी ७! उत्सवापूर्वी पुण्यात गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीचा फ्लेक्स

डॉली कोटक हिने हद पार करत संबंधित तरुण आणि त्याच्या पत्नीची खाजगी बँकिंग माहिती बेकायदेशीरपणे मिळवली. यात तिला तीन बँक कर्मचाऱ्यांची मदत मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. हर्ष श्रीवास्तव व अनंत रूइया (HDFC बँक), जयेश गायकवाड (ICICI बँक) या सगळ्यांनी मिळून पीडिताच्या मोबाईल व ईमेलवर आपले नंबर लिंक करून त्याचा जीपीएस लोकेशन, ऑनलाइन व्यवहार, खासगी फोटो आणि संवादांचा गैरवापर केला.

मे २०२४ मध्ये डॉली कोटक हिच्या नंबरवरून एक धक्कादायक मेसेज आला: "Give money or die in jail... You will never win and die in pain." या मानसिक त्रासामुळे पीडित तरुणाची नोकरीही गेली. कोटक हिने त्याच्या कंपनीच्या HR विभागाला ईमेल करून बदनामी केली आणि नोकरीवरून जबरदस्तीने राजीनामा द्यायला भाग पाडले. पोलीस दुर्लक्ष करत असल्याने पीडित तरुणाने बोरीवली कोर्टात धाव घेतली. कोर्टाने BNSS च्या कलम १७५(३) अंतर्गत FIR नोंदवण्याचे आदेश चारकोप पोलिसांना दिले.नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये खालील कलमांचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा: कलम ६२, ६६(सी)(डी)(ई) IPC अंतर्गत: कलम ४०९, ५११, १२०बी रीड विथ ३४ BNSS कलम ३०८(७) गुन्हा दाखल आहे.

Mumbai Crime News
Gadchiroli accident: मार्निंग वॉकसाठी गेले अन् काळाने गाठलं! ६ मित्रांना भरधाव वाहनाने चिरडले, भयंकर अपघात

डॉली कोटक हिच्यावर DB मार्ग पोलीस ठाण्यात आणखी एका खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. तर तिचा भाऊ सागर कोटक याच्यावर १७ वर्षीय मुलीच्या अपहरण व बलात्काराचा आरोप असून, तो सध्या जामिनावर आहे. या प्रकरणात त्याच्यावर POCSO कायद्यांतर्गत आणि IPC कलम १३७(२), ६४, ७४, ४, ८, १२ अन्वये कारवाई झाली आहे.

या प्रकारातून बलात्कारासारख्या गंभीर कायद्यांचा खाजगी वैर व आर्थिक फायद्यासाठी कसा गैरवापर केला जातो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. निर्दोष नागरिकांच्या जीवनावर यामुळे गंभीर परिणाम होत असून, या पार्श्वभूमीवर कायद्यात सुधारणा आणि तपास यंत्रणांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणातील पुढील तपास सुरु असून पोलिसांकडून आणखी अटकेची शक्यता आहे.

Mumbai Crime News
मॉडेलला पाहून पँटची चैन काढली अन्...; मुलीने सारं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं, चौकात दिवसाढवळ्या घाणेरडं कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com