गुरुग्राममध्ये मॉडेलसमोर सार्वजनिक ठिकाणी तरुणाने पँटची चैन काढून अश्लील कृत्य केलं.
मॉडेलने संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.
पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा नोंदवला.
आरोपी अद्याप फरार असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
delhi obscene video, model obscene incident : राजधानी दिल्लीमध्ये एका तरूणाने मॉडेलकडे पाहून किळसवाणं कृत्य केले. गुरुग्रामच्या राजीव चौक परिसरात रविवारी सकाळी ११ वाजता एका मॉडेलसमोर अज्ञात व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मॉडेलला पाहून तरूणाने पँटची चैन काढली अन् अश्लील कृत्य केले. ही धक्कादायक घटना त्या मुलीने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.
राजधानमधील जयपूरहून गुरुग्रामला परतलेली एक मॉडेल राजीव चौक येथे कॅबची वाट पाहत उभी होती. त्यावेळी मास्क घातलेल्या एका व्यक्तीने तिच्यासमोर पँटची चैन उघडली अन् घाणेरडं कृत्य सुरू केले. मॉडेलने या अश्लील कृत्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. त्या मॉडेलने सांगितले की, आरोपी तिला सतत टक लावून पाहत होता. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, पण नंतर त्याने जवळ येऊन अश्लील कृत्य केले. या घटनेने प्रचंड घाबरली होती.
तरूण तिच्याकडे पाहून अश्लील कृत्य करत होता, त्यावेळी त्या मॉडेलने पोलिस हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही फोन उचलला नाही. नंतर तिने गुगलवरून मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकावर कॉल केला असता, तिला थेट थाण्यात येऊन तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा नसल्याचेही तिला सांगण्यात आले.
या किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ दिल्लीमध्ये वाऱ्यासारखा व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांना जाग आली. या प्रकाराबाबत ऑनलाइन तक्रार दाखल झाल्यावर गुरुग्राम पोलिसांनी हालचाल सुरू केली. सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. बुधवारी (दि. ६ ऑगस्ट २०२५) पीडित मॉडेलने थाण्यात जाऊन आपला जबाब नोंदवला. सध्या पोलिस आरोपीची ओळख पटवण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.