
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर झाले आहे
ही गाडी ११ स्थानकांवर थांबणार असून पुण्यात रात्री ९.५० वा. पोहोचेल.
पुण्याहून अजनीला निघणारी गाडी सोमवार वगळता दररोज धावेल.
प्रवासाचा कालावधी कमी होणार असून प्रवाशांना विमानसेवेपेक्षा स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहे.
When will Nagpur Pune Vande Bharat Express start : नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पण वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून धावणार? याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा सुरू होती. आता नागपूरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. या गाडीचे वेळापत्रक समोर आले आहे. केवळ सुरुवातीची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक कसे असेल? Vande Bharat Express from Ajni to Pune full timetable
गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस दररोज सकाळी साडेनऊ वाजता नागपूरच्या अजनी स्टेशनहून सुटेल आणि रात्री साडे नऊ वाजता पुण्यात पोहचेल. तर गाडी क्र.26101 पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस सायंकाळी साडे सहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता अजनी (नागपूर) स्टेशनवर पोहचेल. गाडी क्र.26101 पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस आठवड्यात सोमवार सोडून इतर सहा दिवस चालेल. या प्रमाणेच गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात मंगळावर सोडून इतर सहा दिवस चालेल...
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ? List of stations for Nagpur Pune Vande Bharat Express
अजनी - सकाळी ९.५० वाजता
वर्धा - सकाळी १०.४० वा.
बडनेरा - दुपारी १२.०३ वा.
अकोला - दुपारी १ वाजता
भुसावळ - दुपारी २.५५ वा.
जळगाव - सायंकाळी - ३.२६ वा.
मनमाड - सायंकाळी ५.२५ वा.
कोपरगाव - ६.२० वा.
अहमदनगर - रात्री ७.३५ वा.
दौंड - रात्री ८.४३ वा.
पुणे - रात्री ९.५०
विमानापेक्षा स्वस्त प्रवास - New train between Nagpur and Pune route and time
पुण्याला धावणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा समावेश मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात झाला आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसचे प्राथमिक देखभाल-दुरुस्ती कार्य नागपूरमध्येच होणार आहे. सणासुदीच्या काळात व्यापारीवर्ग, विद्यार्थी, नोकरदारवर्ग आणि सामान्य प्रवासी मोठ्या संख्येने नागपूर-पुणे यादरम्यान प्रवास करतात. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस त्यांच्यासाठी विमान सेवेपेक्षा अधिक सुलभ व स्वस्त पर्याय ठरू शकतो.
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून सुरू होणार?
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, पण अधिकृत सुरुवातीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार आहे?
अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड आणि पुणे येथे थांबे आहेत.
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आठवड्यात किती दिवस चालेल?
पुणे-अजनी एक्सप्रेस सोमवार वगळता सहा दिवस चालेल. अजनी-पुणे गाडी मंगळवार वगळता सहा दिवस धावेल
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस विदर्भातील प्रवाशांसाठी फायदेशीर कशी ठरणार आहे?
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी विमान सेवेपेक्षा स्वस्त आणि सोयीची असून व्यापारी, विद्यार्थी व नोकरदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.