Pune Ganesh Mandal : वेळ सकाळी ७! उत्सवापूर्वी पुण्यात गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीचा फ्लेक्स

Pune Ganesh Mandal declares 7 AM start for Visarjan : जनार्दन पवळे मंडळाने विसर्जन सकाळी ७ वाजता बेलबाग चौकातून मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत फ्लेक्सही लावला आहे. काही मंडळांनी याला जोरदार विरोध दर्शवला असून, मानाच्या गणपतींना वेळ लागतो हे कारण देऊन विरोध केला आहे.
Pune Ganesh Mandal
Pune Ganesh Mandal Saam TV News Marathi
Published On
Summary
  • जनार्दन पवळे मंडळाकडून सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय

  • फ्लेक्सच्या माध्यमातून जाहीर घोषणा, पुण्यात चर्चा रंगली

  • पोलीस आणि मंडळांमध्ये बैठका, निर्णयावर अद्याप एकमत नाही

  • इतर मंडळांचा विरोध, मानाच्या गणपतींसाठी लागणारा वेळ कारण

Flex controversy over Ganesh Visarjan time in Pune : पुण्यात सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीबाबत गेल्या दोन आठवड्यांपासून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. गणेश मंडळाकडून पोलीस यंत्रणेसोबत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाबाबत विविध बैठका सुद्धा झाल्या. अनेक बैठकांमध्ये गणेशोत्सव पूर्वीच विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाबद्दल जोरदार चर्चा आहेत. रेंगाळत असलेली विसर्जन मिरवणूक, मानाच्या गणपती कडून विसर्जन मार्गस्थ होण्यासाठी लागणारा वेळ, लक्ष्मी रोड वरून जाण्याचा अट्टाहास यासारख्या अनेक गोष्टींबद्दल बैठकांमध्ये वार्तालाप होताना दिसतो.

मंगळवारी पुणे पोलीस आयुक्तालयात दोन स्वतंत्र बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. मानाचे आणि प्रमुख गणेश मंडळ यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली आणि तत्पूर्वी शहरातील इतर मंडळांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या बैठकीत पुणे शहरातील विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत आम्ही सकाळी सात वाजता तयार राहू अशी भूमिका अगदी ठामपणे सांगितली. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतींना लागणारा वेळ लक्षात घेता इतर गणेश मंडळांनी याबाबत जोरदार विरोध केला.

Pune Ganesh Mandal
Mumbai Kabutarkhana : कबुतरखाना हटवण्यावरून दादरमध्ये राडा, जैन समाज आक्रमक, शेकडो आंदोलक रस्त्यावर | VIDEO

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळे संदर्भात असलेला वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करणार अशी भूमिका पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या जनार्दन पवळे संघाकडून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवापूर्वीच जनार्दन पवळे संघाकडून याबाबतचा फ्लेक्स सुद्धा उभारण्यात आला आहे. कसबा पेठेत असणाऱ्या या गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीची वेळ फ्लेक्सच्या माध्यमातून जाहीर करत इतर गणेश मंडळांकडून होणारा आडमुठपणा मोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यातील कसबा पेठेतील या मंडळाकडून हा फ्लेक्स त्यांच्याच परिसरात लावण्यात आल्यामुळे सगळ्यांच लक्ष त्याच्याकडे जातंय.

Pune Ganesh Mandal
नाशिकमध्ये हळहळ! शाळेच्या गेटवरच दुर्दैवी घटना, सहावीतील मुलीचा हॉर्ट अटॅकने मृत्यू

कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघाचे उत्सव प्रमुख राकेश दाखवे म्हणाले, "आम्ही आमच्या मंडळाची विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता बेलबाग चौकातून सुरू करणार आणि या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत कसबा गणपती असल्यामुळे त्या बाप्पाचं विसर्जन होण्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबू. मात्र आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत."

"गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. काही गणेश मंडळांच्या आडमुठेपणामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. वेळ आली तर आम्ही कुठल्या ही ढोल पथकं लावणार नाही पण सकाळी ७ वाजता मिरवणुकीला सुरुवात करणार. यंत्रणा आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे," असं दाखवे म्हणाले.

Pune Ganesh Mandal
Maharashtra Politics : फडणवीस-शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई, एकाच पदासाठी दोघांकडून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com