गुजरातमध्ये अंधश्रद्धेतून आईकडून दोन मुलांची हत्या
पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मध्यरात्री गळा दाबून हत्या
सासऱ्यावरही जीवघेणा प्रयत्न
पोलिसांनी दरवाजा तोडून आरोपी महिलेला अटक केली
गुजरातमधून धक्कदायक घटना समोर आली आहे. एका निर्दयी आईने पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे. या अंधश्रेद्धेतुन तिने तिच्या सासऱ्याला देखील मारण्याचा प्रयत्न केला मात्र ते हातातून निसटल्याने सुदैवाने बचावले. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना गुजरात येथील नवसारी जिल्ह्यातील बिलीमोरा शहरातील देसरा परिसरातील एका फ्लॅटमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेली सुनीता शर्मा तिचा पती शिवकांत, ७ आणि ४ वर्षांचे दोन मुले आणि तिचे सासरे इंद्रपाल यांच्यासोबत गुजरातमध्ये राहत होती. सुनीताच्या पतीला शिवकांतला टायफॉइडचे निदान झाले होते आणि त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुनीताचे सासरे इंद्रपाल त्यांच्या पत्नीसोबत मुलगा शिवकांत याला जेवण देण्यासाठी तसेच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते आणि परत आल्यानंतर ते झोपी गेले. सुनीता तिच्या बेडरूममध्ये होती. अचानक मध्यरात्री, काही दिवसांपासून अस्वस्थ असलेली सुनीता एका देवतेची प्रार्थना करू लागली.
या प्राथर्नेनंतर तिने टोकाचं पॉल उचलत तिच्या पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठी तिने पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपी सुनीताने तिच्या सासरच्या खोलीत गेली आणि तिच्या सासऱ्यांचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शेजाऱ्यांकडे पळून गेले. त्यांनी शेजाऱ्यांना सगळी हकिकत सांगितली.
सुनीताने मात्र घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला आणि शेजाऱ्यांनी वारंवार ठोठावल्यानंतरही तो उघडला नाही. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घडलेली घटना सांगितली. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दरवाजा तोडला आणि मुलांच्या मृतदेहांजवळ बसलेल्या सुनीताला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.