पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात
अपघातात ८ मृत, १५ जखमी
मृतांची संपूर्ण यादी जाहीर
कुटुंबासह काही स्थानिक नागरिक मृत
८ अग्निशमन गाड्यांनी आग आटोक्यात आणली
घटनेचा CCTV फुटेज समोर
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनर ने अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. या धडकेत कंटेनर ने अचानक पेट घेतला. दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली असून त्यांची नवे समोर आली आहेत. तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात घडला. साताराहून पुण्याच्या दिशेने येत असताना नवले पुलावर असलेल्या उतारावर एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. या कंटेनरने पुढे असलेल्या अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. यानंतर या धडकेत कंटेनर ने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत एका चारचाकी मधील कुटुंबाचा मृत्यू झाला. अपघातात आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू झाला, तर १५ जणं जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की गाड्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे रस्त्यावर काचांचा ढीग पडला होता.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ०५ : ४० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला आहे अशी माहिती मिळाली. त्याचवेळी तात्काळ सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशा एकूण ८ अग्निशमन वाहने रवाना झाली होती. घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून ट्रॅक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले आहेत, तर ८२ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकही मृत्यमुखी पडले आहेत.यावर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या मात्र ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे म्हटलं जात आहे. या भीषण अपघातातील मृतांची आणि जखमींची नवे समोर आली आहेत. तसेच जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मृतांची नावे
१) स्वाती संतोष नवलकर (वय ३७, रा. थायरी फाटा)
२) शांता दत्तात्रय दाभाडे (वय ५४)
३) दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (वय ५८, दोघे रा. धायरी)
४) मोक्षिता हेमकुमार रेड्डी (वय ३ लक्ष्मी चौक, चिखली)
५) कारचालक धनंजय कुमार कोळी (वय ३० रा. चिखली पुणे, मुळ- जयसिंगपूर, कोल्हापूर)
६) रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २५ रा. लोणी ता. खंडाळा जि. सातारा)
७) रुस्तम वृद्धार खान (ट्रकचालक) (वय ३५ रा. राजस्थान)
८) मुश्ताक हनीफ खान (क्लिनर) (वय ३१, रा. राजस्थान)
जखमींची नावे
सोफिया अमजद सय्यद (वय १५, रा. रूपीनगर निगडी), रुकसाना इब्राहिम बुरान (४५), बिस्मिल्ला सय्यद (३८, रा. खंडोबा माळ, चाकण), इस्माईल अब्बास बुरान (५२, रा. रुपीनगर निगडी), अमोल मुळे (४६, रा. काळेवाडी), संतोष सुर्वे (४५, रा. भूमकर नगर, नन्हे). नवले हॉस्पिटल सय्यद शालीमा सय्यद, जुलेखा अमजद सय्यद (३२), अमजद सय्यद (४०, रा. भक्ती शक्ती रोड, निगडी), सतीश वाघमारे (३५, रा. शिरूर खांदाड, नांदेड), सोहेल रमनुद्दीन सय्यद (२०, रा. निकोडो चाकण), शामराव पोटे (७९, रा. हिंजवडी), अडवांटेज रुग्णालय, मार्केट यार्ड- अंकित सलीयन (वय ३०, रा. तारा वेस्ट आंबेगाव).
दरम्यान या पुलावर वारंवार अपघात होत असून या अपघाताप्रकरणी चालकांना वेठीस धरले जात आहे. मात्र हे खरं कारण नसून या अपघाताचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे या परिसरातील असणारा तीव्र उतार. तो उतार कमी करणे हाच त्यावरचा पर्याय आहे किंवा लवकरात लवकर रिंगरोड तयार करून अवजड वाहनांची वाहतूक बाहेरून करा,अशी मागणी वारंवार केली जाते आहे.या दुर्घटनेने पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.