

महाराष्ट्रासह २२ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी.
मुंबई महानगर क्षेत्रात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता.
पुढील सात दिवस अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस अपेक्षित.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आज उत्तर आणि मध्य भारतातील हवामानात बदल होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, तर गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यात अलर्ट देण्यात आलाय.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघरमध्ये मंगळवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक तीव्र पावसाचा अंदाज आहे. तर गुरुवारी तेथील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आज उत्तर प्रदेश आणि बिहारसह २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील सहा ते सात दिवसांत उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज वर्तवलाय. मंगळवारी अनेक राज्यांत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे. दिल्ली, मुंबई, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असतानाच, पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मात्र पुढील आठवड्यात मान्सूनची सक्रियता मंदावणार आहे.
भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की, पुढील सहा ते सात दिवसांत उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.