मध्यरात्री हायवेवर थरार! १८ ते २० हल्लेखोरांचा बसवर अंदाधुंद गोळीबार; १८ प्रवाशांचं अपहरण, सिंध हादरलं

sindh bus attack passenger kidnapping pakistan : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात बंदुकधारींनी बसमधील १८ प्रवाशांचं अपहरण केलं. या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
pakistan News : पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात हल्लेखोरांनी बसवर अंदाधुंद गोळीबार करून १८ प्रवाशांचे अपहरण केले.
pakistan News : पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात हल्लेखोरांनी बसवर अंदाधुंद गोळीबार करून १८ प्रवाशांचे अपहरण केले. social media
Published On

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांच्या 'कर्माची फळं' तेथील जनतेला भोगावी लागत आहेत. संपूर्ण पाकिस्तानला हादरवणारी अशीच एक घटना सिंध प्रांतात घडली आहे. या घटनेनं सर्वत्र दहशत पसरली आहे. १८ ते २० अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी एका प्रवासी बसवर बेछूट गोळीबार केला. बसमधील १८ पुरुष प्रवाशांचं अपहरण केलं. ही बस क्वेटाकडे जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील घोटाकी परिसरात हे ओलीसनाट्य घडलं. अज्ञात हल्लेखोरांनी सिंध आणि पंजाब सीमेजवळ हायवे लिंक रोडवर रात्रीच्या सुमारास एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. बसमधील १८ प्रवाशांचं अपहरण करण्यात आलं. गोळीबारात बस चालक आणि काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

प्रत्यक्षदर्शी महिलेनं काय सांगितलं?

जियो न्यूजच्या वृत्तानुसार, बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेनेच सगळा घटनाक्रम सांगितला. जवळपास १८ ते २० हल्लेखोर होते. सर्वांकडे बंदुका होत्या. सर्वांनी चेहरे स्कार्फने झाकलेले होते. हल्लेखोरांनी सर्व पुरूष प्रवाशांना बसमधून उतरायला सांगितले. पण बसमधील इतर महिला प्रवाशांना कोणतीही इजा पोहोचवली नाही. शस्त्रधारी हल्लेखोर त्या सर्व पुरूष प्रवाशांना घेऊन गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महिलेनं दिली.

अपहरणनाट्याची चौकशी

पाकिस्तानमध्ये १८ प्रवाशांचं अपहरण झाल्यानंतर सिंधच्या गृहमंत्र्यांचे प्रवक्ता जिया उल हसन लांझर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना खूपच दुःखद आहे. चालक आणि वाहकाव्यतिरिक्त बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. पोलिसांनी या अपहरणाच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण

पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी पहिल्यांदाच असं कृत्य केलेलं नाही. याआधीही अनेक घटना घडल्या आहेत. खैबर पख्तुनख्वा आणि बलूचिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांची दहशत बघायला मिळाली आहे. येथील सुरक्षा दले कायम या हल्लेखोरांच्या निशाण्यावर असतात.

pakistan News : पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात हल्लेखोरांनी बसवर अंदाधुंद गोळीबार करून १८ प्रवाशांचे अपहरण केले.
National Herald Case : सोनिया-राहुल गांधींना दिलासा; सत्याचा विजय झाल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

'बसमधील महिला सुरक्षित'

क्वेटाकडे जाणाऱ्या या बसमध्ये चालक, वाहक आणि इतर ३० प्रवासी होते. त्यात काही महिला देखील होत्या. हल्लेखोरांनी बसवर गोळीबार केला. साधारण १८ ते २० बंदुकधारी होते. त्यांनी सर्व पुरूष प्रवाशांना बसमधून उतरायला सांगितले. पण बसमधील कोणत्याही प्रवासी महिलेला इजा पोहोचवली नाही. हल्लेखोरांनी १८ पुरुष प्रवाशांचे अपहरण केले, अशी माहिती त्या महिलेने दिली.

pakistan News : पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात हल्लेखोरांनी बसवर अंदाधुंद गोळीबार करून १८ प्रवाशांचे अपहरण केले.
मोठा विमान अपघात टळला! इंडिगोचा मागचा भाग रांची एअरपोर्टच्या रनवेला धडकला, ७० प्रवाशांच्या हृदयाची धडधड...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com