नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवरच मारली उडी! पत्नीसोबत पुढे काय झालं? व्हिडिओ व्हायरल

Meerut Wife Clings To Car Bonnet After Catching Husband With Another Woman: मेरठमध्ये पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नीने जाब विचारला. वादानंतर पतीने कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पत्नी कारच्या बोनेटला लटकली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
MEERUT WIFE CLINGS TO CAR BONNET AFTER CATCHING HUSBAND WITH ANOTHER WOMAN
MEERUT WIFE CLINGS TO CAR BONNET AFTER CATCHING HUSBAND WITH ANOTHER WOMANsaam tv
Published On: 

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पतीला दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये पाहिल्यानंतर पत्नीने त्याला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर पतीने कार काढली पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संतापलेली पत्नी थेट गाडीच्या बोनेटला लटकली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता सिंह यांनी त्यांचे पती मयंक सिंह यांना प्रेयसी माही वर्मासोबत कारमध्ये पाहिले. त्यानंतर त्यांनी दोघांना जाब विचारला. यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर मयंकने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनीता कारच्या समोर होत्या आणि त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कारच्या बोनेटला धरून ठेवले.

MEERUT WIFE CLINGS TO CAR BONNET AFTER CATCHING HUSBAND WITH ANOTHER WOMAN
Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

या प्रकरणी लोहियानगर पोलिसांनी मयंक सिंह आणि माही वर्मा यांना अटक केली आहे. घटनेत वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नी आणि पतीमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीने वाहनाच्या सहाय्याने पत्नीला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी वाहन जप्त केले असून, या घटनेमागील संपूर्ण परिस्थिती आणि घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.

MEERUT WIFE CLINGS TO CAR BONNET AFTER CATCHING HUSBAND WITH ANOTHER WOMAN
राज्यसभा निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र; उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाची माहिती समोर आली. व्हिडिओमध्ये सुनीता सिंह या चालत्या कारच्या बोनेटला धरून लटकलेल्या दिसत आहेत. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू असून, वाद नेमका कसा झाला आणि त्यानंतर काय घडले, याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com