Meerut Theft News  Thieves write 'sorry'
Meerut Theft News Thieves write 'sorry'SAAM TV

Meerut Theft News : चोरट्यांनी दागिन्यांच्या दुकानात घुसण्यासाठी खोदला 15 फूट बोगदा, तिजोरीवर लिहिले 'सॉरी'

Meerut Jewelers shop theft News : मेरठमध्ये घडलेल्या या चोरीच्या विचित्र घटनेने पोलिसांसह सर्वच चकित झाले आहेत.
Published on

Meerut Jewelers Shop Theft: चोरी करण्यासाठी चोर काय करेल सांगता येत नाही. अनेकद चोर चोरी करण्यासाठी अनोख्या युक्त्या शोधतात. पंरुत तरीही त्यांच्या हाती काही लागत नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे. मेरठमध्ये घडलेल्या या चोरीच्या विचित्र घटनेने पोलिसांसह सर्वच चकित झाले आहेत.

मेरठमध्ये चोरट्यांनी मोठा बोगदा खोदून चक्क ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांना दुकानातली तिजोरी उघडता आली नाही. यानंतर चोरट्यांनी दुकानातील भिंतीवर 'सॉरी' असा मेसेज लिहून निघून गेले.

Meerut Theft News  Thieves write 'sorry'
Crime News: वडिलांच्या अपहरणाच्या कारणावरून एकाची हत्या; पोलिस तपासात सत्‍य आले समोर

एवढेच नाही तर या चोरट्यांची कामाल म्हणजे आपण चोरी करत आहोत हे देवाला दिसू नये म्हणून त्यांनी दुकानातील श्रीकृष्णाची मूर्ती उलटी फिरवली होती. मेरठ पोलीस आता या अनोख्या चोरांचा शोध घेत आहेत.

मोहकमपूरचे रहिवासी दीपक लोधी यांचे मेरठमधील परतापूर पोलीस स्टेशन परिसरात रिठाणी पीरजवळ दीपक ज्वेलर्स आणि जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी जवळ असलेल्या नाल्यात रेंगाळत त्यांच्या दुकानात बोगदा केला आणि 5 हजार रुपये रोख रकमेसह 45 हजार रुपये किमतीचे कृत्रिम दागिने चोरून नेले.

एवढेच नाही तर चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. पहाटे चोरीची घटना समजताच अनेक व्यापाऱ्यांनी जमा होवून पोलिसांसमोरच गोंधळ घातला आणि पोलिसांकडून घटनेचा खुलासा करण्याची मागणी केली.

Meerut Theft News  Thieves write 'sorry'
Eknath Shinde News : बच्चू कडू यांच्या 'त्या' विधानावर CM एकनाथ शिंदेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले...

चुन्नू-मुन्नू टोळीतील होते चोरटे

चोरी केल्यानंतर चोरट्यांनी तिजोरीवर हे बोगदा चोर चुन्नू-मुन्नू टोळीतील असल्याचे लिहिले. तसेच त्यांनी तिजोरीवर "माफ करा आम्ही चोरी करू शकलो नाही, आम्हाला नाव कमवायचं आहे. काहीही सामान घेऊन जात नाही आहोत", असे लिहून ठेवले. यानंतर त्यांनी काउंटरवर लाल रंगाच्या मार्करने त्यांनी हेच सर्व इंग्रजीतही लिहिले.

पोलिसांकडून चोरट्यांच्या शोध सुरू

दीपक ज्वेलर्सच्या मालकाने सांगितले की, त्यांच्या दुकानात चौथ्यांदा चोरी झाली आहे. याचा पोलिसांना आजतागायत काहीही खुलासा करता आलेला नाही. घटनेचा खुलासा न केल्यास दुकान बंद करू असे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी या अजब चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com