Crime News
Crime NewsSaam tv

Crime News: वडिलांच्या अपहरणाच्या कारणावरून एकाची हत्या; पोलिस तपासात सत्‍य आले समोर

वडिलांच्या अपहरणाच्या कारणावरून एकाची हत्या; पोलिस तपासात सत्‍य आले समोर
Published on

तबरेज शेख

सिन्‍नर : सिन्नर येथे नाशिक– पुणे महामार्गावरील धोंडवीरनगर शिवारात रस्त्याच्या कडेला गोंदे येथील संपत रामनाथ तांबे या (Nashik News) तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तर ही हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही हत्‍या (Crime News) वडीलांचे अपहरण केल्‍याच्‍या कारणावरून झाल्‍याचे समोर आले आहे. (Maharashtra News)

Crime News
Kalyan News: सात महिन्यानंतर सापडला शिंदे गटाचा बॅनर काढणारा व्यक्ती; सीसीटीव्हीमुळे लागला शोध

सिन्‍नर येथे झालेल्‍या सदर प्रकरणाबाबत पोलीस तपासात अज्ञात इसमांनी तलवारीने शरीरावर बोसकून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. तर घटनास्थळी थोड्या अंतरावर एक तलवारीचे पाते व महामार्गवर मोटारसायकल आढळून आली होती. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा कसून तपास घेतला असता घटनेतील संशयित प्रवीण चांगदेव तांबे याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.

वडीलांचे अपहरण केल्‍याचा बदला

संशयित प्रवीण तांबे याच्या वडिलांचे अपहरण केल्याच्या रागातून प्रवीण तांबे याने गोंदे ते सिन्नर महामार्गावर हॉटेल अन्नपूर्णाजवळ मयत संपत याला गाठून त्याच्या मानेवर, पोटावर, हातावर तलवारीने वार करत हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com