Marriage Hall Fire: लग्नसोहळा सुरू असताना मंडपात भीषण आग; वधू-वरासह शेकडो वऱ्हाडी होरपळले, भयंकर घटना!

Iraq Marriage Hall Fire Accident: लग्नसोहळा सुरू असताना अचानक एका हॉलमध्ये भीषण आग लागली. या आगीत वधू वरासह जवळपास १०० हून अधिक वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.
massive fire breaks out at Iraq Marriage Hall groom and bride many-dead-and injured
massive fire breaks out at Iraq Marriage Hall groom and bride many-dead-and injuredSaam TV
Published On

Iraq Marriage Hall Fire Accident

इराकमधून एक भयानक घटना समोर आली आहे. लग्नसोहळा सुरू असताना अचानक एका हॉलमध्ये भीषण आग लागली. या आगीत वधू वरासह जवळपास १०० हून अधिक वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर जवळपास १५० जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

इराकच्या उत्तर निनेवे प्रांतातील अल-हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

massive fire breaks out at Iraq Marriage Hall groom and bride many-dead-and injured
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर थांबणं जीवावर बेतलं, आयशरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी एका लग्नसोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वधू आणि वराकडील हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती होती. लग्न लागताच काही लोकांनी हॉलबाहेर फटाके फोडण्यास सुरुवात केली.

यातील एक फटाका लग्नाचा मंडपात येऊ फुटला. त्यामुळे क्षणात मंडपाला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले. इराकच्या नागरी संरक्षण संचालनालयाने सांगितले की, 'मंडपात अत्यंत ज्वलनशील वस्तू होत्या. त्यामुळे आगीने भीषण रुप धारण केलं.

त्याचबरोबर कमी किमतीच्या बांधकाम साहित्याचा वापर केल्यामुळे हॉलचा काही भाग कोसळला. त्यामुळे १०० हून अधिक वऱ्हाडी होरपळले. यामध्ये वधू आणि वराचा देखील समावेश आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आगीत होरपळलेल्या वऱ्हाड्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. मात्र, या आगीत आतापर्यंत शेकडो वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. त्याचबरोबर घटनेत जखमी झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहे. इराकच्या पंतप्रधान कार्यालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये माहिती दिली.

Edited by - Satish Daud

massive fire breaks out at Iraq Marriage Hall groom and bride many-dead-and injured
Shiv Sena News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com