Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर थांबणं जीवावर बेतलं, आयशरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident News: मंगळवारी रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला.
Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident News Saam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident News

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. परिवहन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना फोल ठरल्याचं दिसून येतयं. मंगळवारी रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident News
Pune Fire News: गणपतीच्या आरतीत विघ्न, मंडपाला लागली आग; पुण्यातील धक्कादायक घटना

या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विरेंद्र पांडे असे मृतकाचे नाव असून तो उत्तरप्रदेशातील रहिवाशी असल्याचं कळतंय. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला.

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) चॅनल क्रमांक २६१ वर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या कडेला एका ट्रकचालकाने ट्रक उभा केला. यावेळी ट्रकची पाहणी करत असताना, पाठीमागून भरधाव वेगात आयशर आला.

या आयशरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकच्या पाठीमागे उभ्या असलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे, पोहेकॉ सतीश मुळे, पोकॉ गोविंद खंडागळे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतलं आहे.

Edited by - Satish Daud

Samruddhi Mahamarg Accident News
Jalna Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी बस पुलाखाली कोसळली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com