Jalna Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी बस पुलाखाली कोसळली

Jalna Accident News: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला.
Jalna private bus accident
Jalna private bus accidentSaam TV

Jalna Private Bus Accident

जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस थेट पूलाखाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Jalna private bus accident
Pandharpur Railway Accident: पंढरपुरात रेल्वेचा अपघात; 15 ते 20 मेंढ्यांना चिरडलं, मेंढपाळांचं काळीज पिळवटलं

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघाली होती.

मध्यरात्रीच्या सुमारास ती बदनापूर (Jalna Bus Accident) येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. ही घटना छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घटना घडली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बदनापूर व जालना पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये २५ प्रवाशी जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून जखमेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Jalna private bus accident
ICC World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी टीम इंडियाला मोठा धक्का; दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com