Bengaluru Fire Video: कोरमंगलामधील पबला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या ४ मजल्यावरून व्यक्तीने मारली उडी

Fire Video: कोलमंगलामधील बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मडपाइप नावाचा पब होता. त्या पबला आग लागल्याची घटना घडलीय.
Massive Fire Pub
Massive Fire PubSaam Tv
Published On

Bengaluru Fire Video Pub In Koramangala:

बंगळुरू येथील कोरमंगला येथे असलेल्या एका पबला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. एका बहुमजली इमारतीच्या ४ थ्या मजल्यावर आग लागली असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपण व्हिडिओ पाहू शकतो की, आगीने इमारतीला कसा विळखा मारला आहे. (Latest News)

फ्रि फ्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कोलमंगलामधील बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मडपाइप नावाचा पब होता. त्या पबमध्ये आग लागल्याची घटना घडली. हा पब बंगळुरूमधील प्रसिद्ध पब आहे. तवरेकेरे मेन रोडवर हा पब असून याच्या समोर फोरम मॉल आहे. प्राथमिक वृत्तानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु हेच कारण आग लागण्यास कारणीभूत असल्याचं सांगता येऊ शकत नाही. माहितीनुसार काहीजण गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचं सांगत आहेत. तर काहीजण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवत आहेत. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहेत. दरम्यान पबला आग लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये इमारतीच्या छतावर स्फोट होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग शमवण्याचे प्रयत्न करत आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरूही आग लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग भडकली आहे. आगीपासून जीव वाचवण्यासाठी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एका उडी मारल्याचे देखील एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु त्याची प्रकृती कशी आहे याची पुरेशी माहिती माध्यमांना मिळालेली नाहीये. दरम्यान अग्निशमन दल आग शमवण्याचे शर्तीतेच प्रयत्न करत आहेत. तर बचाव कार्यदेखील करत आहेत.

Massive Fire Pub
Pune Bangalore National Highway : पुणे- बंगळुरू महामार्गावर आरपीआयचा रास्ता राेकाे, जाणून घ्या वाहतूकीची स्थिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com