PM Modi On Manipur Viral Video : मला प्रचंड राग आलाय; दोषींना सोडणार नाही; मणिपूरमधील घटनेवर PM मोदींना संताप अनावर

Latest Update on Manipur Viral Video : मणिपूरमधील महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही संताप अनावर झाला आहे.
PM Narendra Modi On Manipur Viral Video
PM Narendra Modi On Manipur Viral VideoPM Narendra Modi Reaction on Manipur Viral Video
Published On

PM Modi On Manipur Viral Video News Update

मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावरून फिरवलं होतं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझं मन प्रचंड दुःखी झालंय. तसंच या घटनेमुळं प्रचंड राग आला आहे. कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडणार नाही, अशा शब्दांत मोदींनी संताप व्यक्त केला. (Manipur News)

मणिपूरमधील दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना लज्जास्पद आहे. माझं मन दुःखी झालंय असं सांगतानाच पंतप्रधान मोदी भावुक झाले. गुन्हेगारांना सोडणार नाही. दोषींना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

PM Narendra Modi On Manipur Viral Video
Manipur News : भयावह! मणिपूरमध्ये २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) माध्यमांशी संवाद साधला. पाप करणारे किती आहेत, कोण आहेत? त्यांच्यामुळं संपूर्ण देशाची मान शरमेने खाली जाते. दोषींवर कठोर कारवाई करावी. घटना राजस्थानची, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची. कायदा आपले काम करेलच. महिलांचा सन्मान कायम राहील. कायदा संपूर्ण ताकदीनिशी आणि कठोरातील कठोर पावले उचलेल, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com