Bihar Viral: देखते है तुमको प्यार हुआ....; ऑन ड्युटी असताना रिल बनवणं महिला निरीक्षकाला पडलं महागात

Viral News: बिहार पोलिसांच्या महिला उपनिरीक्षक प्रियंका गुप्ता यांना गणवेशात सोशल मीडियावर रील बनवणे महागात पडले. त्या पूर्व चंपारणच्या पहाडपूर पोलिस ठाण्यात तैनात होत्या.
Viral News
Viral Newsgoogle
Published On

बिहार पोलिसांच्या महिला उपनिरीक्षक प्रियंका गुप्ता यांना सोशल मीडियावर वर्दीत रील बनवणे चांगलेच महागात पडले आहे. प्रियंका गुप्ता पूर्व चंपारणमधील पहाडपूर पोलिस ठाण्यात तैनात होत्या. ड्युटीवर असताना त्यांनी इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील बनवले होते, ज्यात त्यांनी वर्दीत असताना व्हिडिओ काढले होते, जे व्हायरल झाले. प्रियंका गुप्ता यांनी गाडीतच नाही तर बँकेतही रील बनवले होते, आणि त्यात चित्रपटातील गाणी पार्श्वभूमी म्हणून ठेवली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसपी स्वर्ण प्रभात यांनी महिला उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.

इन्स्पेक्टर प्रियंका गुप्ता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती वर्दीत गाडीत बसलेली दिसते आणि गाडीच्या आत टोपी ठेवलेली आहे. याशिवाय, दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती एक विचार व्यक्त करत आहे, "आयुष्य मला शिकवत आहे की सर्वांशी मैत्री करा पण कोणाकडूनही काहीही अपेक्षा करू नका," जो सध्या व्हायरल झाला आहे. प्रियंकाच्या या रील्समुळे ती चर्चेत आली असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहिली जात आहे.

Viral News
Bird Flu: पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; १८ मांजरींचा मृत्यू, प्रशासन अलर्ट

बिहारच्या डीजीपींनी सर्व पोलिसांना ड्युटीवर असताना वर्दीत रील किंवा व्हिडिओ बनवू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतरही, एसआय प्रियंका गुप्ता सोशल मीडियावर सक्रिय राहिल्या आणि गणवेशात व्हिडिओ बनवत राहिल्या. प्रियंका गुप्ता फेसबुकवर आपल्या अकाउंटवर सक्रिय असून, तिच्या १२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्थानिक नागरिकांनी या बाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, ज्यामुळे तिला निलंबित करण्यात आले.

Viral News
Holi Special Train: होळीनिमित्त प्रवाशांसाठी खुशखबर; मध्य रेल्वेचा मोठी निर्णय, ४८ विशेष ट्रेन्स चालवणार, वाचा सविस्तर

सब इन्स्पेक्टर प्रियंका गुप्ता यांनी सरकारी वाहनात प्रवास करत असताना आणि बँक तपासणीदरम्यान पोलिस स्टेशनच्या आत रील बनवले. यावर, पूर्व चंपारणचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी प्रियंका गुप्ताला निलंबित केले. त्यांनी स्पष्ट केले की पोलिस मुख्यालयाने कडक सूचना दिल्या आहेत की ड्युटीवर असताना वर्दीत रील बनवता येणार नाही. तसेच, ड्युटी दरम्यान मोबाईल फोन वापरण्यावरही बंदी आहे. याविरोधात कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com