Shocking News : कुत्रे मागे लागताच चिमुकली प्रचंड घाबरली; जीवाच्या आकांताने पळाली, पण शेवटी मृत्यूने गाठलंच

Dog Attack Girl Death : शाळा सुटल्यानंतर शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिमुकली घरी परतत होती. तेव्हा भटक्या कुत्र्यांच्या एका टोळक्याने तिला रस्त्यात घेरलं.
Dog Attack Girl Death
Dog Attack Girl DeathSaam TV
Published On

शाळेतून घरी येत असताना ७ वर्षीय चिमुकलीला अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने घेरलं. या कुत्र्यांच्या तावडीत सापडलो तर ते आपले लचके तोडतील या भीतीने चिमुकली प्रचंड घाबरली. आरडाओरड करत तिने जीवाच्या आकांताने घराकडे धाव घेतली. मात्र, तरीही कुत्र्यांनी तिचा पिछा सोडला नाही. त्यामुळे पळता पळता चिमुकलीला दम लागला. अखेर घरात पोहचताच तिला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना मध्यप्रदेशच्या उज्जैन शहरात घडली.

Dog Attack Girl Death
Cake Cancer News : सावधान! केक खाल्ल्याने कॅन्सर होतो, खळबळ उडवून देणारा दावा; व्हायरल मॅसेजमागचं सत्य काय?

इन्सिया लोहवाला (वय ७) असं मृत मुलीचे नाव आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे चिमुकलीचा जीव गेल्याने संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील फ्रीगंज भागात ही घटना घडली आहे. येथील व्यापारी मुस्तफा लोहवाला यांची ७ वर्षांची चिमुकली इशिया ही सेंट पॉल शाळेची पहिली विद्यार्थिनी होती. परीक्षा सुरु असल्याने ती शुक्रवारी पहाटे घराजवळ असलेल्या शाळेत गेली. पेपर सुटल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ती घरी परतत होती.

तेव्हा भटक्या कुत्र्यांच्या एका टोळक्याने इशियाला रस्त्यात घेरलं. कुत्र्यांना पाहून चिमुकली प्रचंड घाबरली. तिने आरडाओरड केली, पण जवळ कुणीही मदतीसाठी नसल्याने जीवाच्या आकांताने ती घराकडे पळत सुटली. यामुळे तिचा श्वास घुसमटला आणि घरी पोहचताच तिला रक्ताच्या उलट्या झाल्या.

रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले. जीवाच्या आकांताने धावल्याने इशियाच्या हृदयाचे ठोके वाढले, रक्तदाबामुळे तिला उलट्या झाल्या आणि बेशुद्ध झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात संतापाचं वातावरण आहे.

दरम्यान, उज्जैन शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत असून ते दिवसाढवळ्या नागरिकांवर हल्ला करतात. आतापर्यंत महिला, वृद्ध आणि लहान मुलांना या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आमच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असा आरोप मृत इशियाच्या वडिलांनी केला आहे.

Dog Attack Girl Death
Viral Video: बाईsss..काय प्रकार? मुंबईच्या लोकलमध्ये महिलांनी काय केलं? VIDEO होतोय तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com