Cake Cancer News : सावधान! केक खाल्ल्याने कॅन्सर होतो, खळबळ उडवून देणारा दावा; व्हायरल मॅसेजमागचं सत्य काय?

Cake Cancer News in Marathi : तुम्हीही जर सतत केक खात असाल तर सावध व्हा. कारण, केकमध्येही आता कॅन्सरचे घटक आढळून आले आहे, असा दावा करण्यात आला आहे.
Cake Cancer News
Cake Cancer NewsSaam TV
Published On

संदीप चव्हाण, साम टीव्ही

कोणतंही शुभ कार्य असेल तर केकशिवाय पूर्णच होत नाही. वाढदिवस, लग्न समारंभ, पार्टीत हमखास केक आणला जातो आणि लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत आवडीने केक खातात. पण तुम्हीही जर सतत केक खात असाल तर सावध व्हा. कारण, केकमध्येही आता कॅन्सरचे घटक आढळून आले आहे, असा दावा करण्यात आला आहे. रेड वेलवेट आणि ब्लॅक फॉरेस्ट या केकमध्ये कॅन्सर होणारे घटक आढळून आल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

Cake Cancer News
Child Care Tips : जेवताना सुद्धा मुलं फोन खेळतात? या टिप्सने वाईट सवयी होतील दूर

त्यामुळे हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात. बेंगळुरूमध्ये 12 प्रकारच्या केकमध्ये कॅन्सर होणारे घटक आढळले आहेत. अन्न व सुरक्षा विभागाने गंभीर इशारा दिला आहे. यामुळे कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला, असा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. अनेकजण केक खातात. त्यामुळे आमच्या टीमने असे केकमध्ये कॅन्सर होणारे घटक खरंच आढळले आहेत का? हे तपासून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

केक खाल्ल्याने कॅन्सर होतो?

  • बेंगळुरूमधील अनेक बेकरीमधून केकचे नमुने घेण्यात आले

  • 12 वेगवेगळ्या प्रकारच्या केकमध्ये कॅन्सरचे घटक आढळले

  • रेड वेलवेट-ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर

  • कृत्रिम रंग आरोग्यासाठी अत्यंत घातक

  • चाचणी दरम्यान, अलुरा रेड, सनसेट यलो एफसीएफ, पॉन्सो 4 आर

  • कार्मोइसिन यांसारखे कृत्रिम रंग आणि घटक आढळून आले

  • अतिप्रमाणात कृत्रिम रंग वापरलेले केक खाल्ल्यास आरोग्यास घातक

केक तयार करण्यासाठी अनेक घातक रंग वापरले जातात. रेड वेलवेट आणि ब्लॅक फॉरेस्ट सारख्या केकमध्ये कार्सिनोजेनिक पदार्थ आढळले आहेत. हे पदार्थ अतिप्रमाणात टाकले तर काय धोका निर्माण होतो हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

हे जरी कर्नाटक आढळून आलं असलं तरी सगळीकडेच केक बनवण्यासाठी घातक रंग, पदार्थ वापरले जातात आणि अधिक प्रमाणात वापरलेले घातक रंगाचे पदार्थ तुम्ही खात असाल तर गंभीर आजाराचे बळी पडू शकता, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com