

भोपाळमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
आरोपींनी प्रायव्हेट व्हिडिओ काढून केलं ब्लॅकमेल
आरोपींकडून पीडित मुलीकडे १ लाख रुपयांची मागणी
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कोहेफिजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ११ वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली आहे. अत्याचारानंतर ब्लॅकमेल आणि बळजबरीने धर्मांतर करण्यास दबाव टाकल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. या घटनेने भोपाळमध्ये खळबळ उडाली आहे.
मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनाने आरोपींवर कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अंकिता खातरकर यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आरोपीने आणखी किती मुलींवर अत्याचार केला, याचा तपास देखील पथक करणार आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांच्या संपर्कात कसे आले, याचाही तपास पथक करणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भोपाळच्या शाहपुरा भागात एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली. पीडित विद्यार्थिनीची वर्गातील एका मैत्रिणीमुळे आरोपीसोबत ओळख झाली. आरोपीने विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला सामसूम जागी फिरायला नेलं. त्यानंतर कार थांबवून त्या कारमध्येच अत्याचार केला. पीडित मुलीवर ४ वेगवेगळ्या कारमध्ये अत्याचार केल्याचे तपासात समोर आलं आहे.
आरोपी पीडित मुलीवर अत्याचार करताना त्याचे मित्र कारच्या मागे लपायचे. ते लपून छपून दोघांचा व्हिडिओ काढायचे. काही दिवसांनी आरोपींनी प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल सुरू केलं. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीकडे १ लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या पीडित मुलीने त्यांना ४० हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपींकडून छळ थांबेना.
विद्यार्थिनीने आरोपीला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. त्यानंतर आरोपीने दोघांचा प्रायव्हेट व्हिडिओ तिच्या मैत्रिणीला पाठवला. त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकू लागला. आरोपीच्या छळाला कंटाळून पीडित मुलीने पोलिसांत धाव घेतली. आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली. या प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.