भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर; कुणा कुणाला मिळाली संधी? वाचा

pmc Standing Committe : भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आलीये. यात भाजपकडून १२ नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.
pmc Standing
pmc Standing CommitteSaam tv
Published On
Summary

भाजपकडून पुणे महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा

समितीत अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांना पहिल्यांदाच संधी

अध्यक्षपदाच्या शर्यतीत श्रीनाथ भिमाले यांचं नाव चर्चेत

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे महापालिकेत पहिली सर्व साधारण सभा पार पडली. या सभेत भाजपकडून आगामी स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांची यंदा या समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता महापालिकेत पुढील आठवड्यात पीठासन अधिकारीच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड होणार आहे.

pmc Standing
चंद्रपूरवरुन ठाकरे बंधूंमध्ये ठिणगी? ठाकरेंचा भाजपला पाठिंबा, मनसेचा टोला

आता भाजपचे नगरसेवक आणि स्थायीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे श्रीनाथ भिमाले यांनी याविषयी महत्वाची माहिती दिली. तसेच भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी आली.

भाजप पुणे स्थायी समिती सदस्य

रूपाली धाडवे

कालिंदा पुंडे

जयश्री भुमकर

विशाल कानवडे

सातव रत्नमाला

प्राची आल्हाट

मयुरी कोकाटे

मानवतकर निशा

श्रीनाथ भिमाले

दादा कोद्रे

वृषाली कामठे

संदीप बेलदरे

pmc Standing
माजी खासदाराच्या शूटरची १५ गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईचं स्थायी समिती अध्यक्षपद कोणाकडे जाणार?

मुंबई महापालिकेच्या महापौराची निवड झाली आहे. मुंबईत भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती अध्यक्षपदाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. यासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावांची चर्चा आहे .

Q

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव चर्चेत आहे?

A

भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

Q

पुणे स्थायी समितीच्या सदस्यपदी कोणाला संधी मिळाली?

A

निशा मानवतकर, श्रीनाथ भिमाले, दादा कोद्रे, वृषाली कामठे, विशाल कानवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्हाट, रूपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भुमकर, मयुरी कोकाटे आणि संदीप बेलदरे यांची निवड करण्यात आलीये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com