Bus Accident : भरधाव ट्रकची ३ बसेसला धडक; भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी

भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या २ एसटी बसेसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
Madhya Pradesh Bus Accident
Madhya Pradesh Bus Accident ANI
Published On: 

Madhya Pradesh Bus Accident : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या २ एसटी बसेसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ५० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मध्यप्रदेशच्या सिंधी जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Madhya Pradesh Bus Accident
Chhattisgarh Accident : भरधाव ट्रकने पिकअपला उडवलं; भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक नेत्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शिवराज यांनी रात्रीच घटनास्थळी पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

मृतांच्या नातेवाईकांपैकी कोणी सरकारी नोकरीसाठी पात्र असेल तर त्याला त्याच्या पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल, असेही सीएम शिवराज म्हणाले. अपघाताबाबत माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये आणि जखमींना ५ लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही बस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सतना येथील कार्यक्रमातून परतत होत्या. बस रात्री ९ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास मोहनिया बोगद्याजवळ पोहोचल्या असता, त्यांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण (Accident) होती की, यातील दोन बस खड्ड्यात पडल्या. तर एक बस त्याच रस्त्यावर उलटली.

या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींपैकी ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मोठी आरडाओरड झाली. स्थानिक नागरिकांनी अपघातातील जखमींना तातडीने बाहेर काढले.

त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, बचाव पथकासह  पोलिसांनी (Police)घटनास्थळी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघातानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्विट करत रीवा मेडिकल कॉलेज आणि संजय गांधी हॉस्पिटलमध्ये धाव घेत शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि जखमींच्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

'जखमींना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. आमचे जखमी बंधू-भगिनी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. घटना हृदयद्रावक आहे. जखमींच्या उपचारासाठी चांगली व्यवस्था करणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. गरज भासल्यास जखमींना एअर अॅम्ब्युलन्सने इतरत्र उपचारासाठी नेले जाईल', अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.