

Chhattisgarh Baloda Bazar Accident : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने प्रवाशी खचाखच भरलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना छत्तीगडच्या बालोदाबाजार जिल्ह्यातील भाटापाडा परिसरात गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)
अपघाताची माहिती माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ११ जणांचे मृतदेह आपल्या ताब्यात घेतले असून गंभीर जखमी झालेल्या १० जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून या दुर्देवी घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालोदाबाजार जिल्ह्यातील साहू कुटुंबातील सदस्य एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्जुनी येथून खिलोरा गावात गेले होते. तेथून कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परतत असताना, खमारिया परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण (Accident) होती, की पिकअपचा चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात एकाच परिवारातील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन लहान बालकांचा देखील समावेश आहे. दरम्यान, अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यांनी तातडीने नजीकच्या पोलिस स्टेशनला फोनवरून ही माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातातील २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या भयंकर घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.