MP Road Accident: मुंडन विधी करुन घराकडे जाताना काळाची झडप, कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ ठार

​Sehore Road Accident: मुलाचे मुंडन करुन पुन्हा घराकडे परतताना कार डिवायडरला धडकून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे.
​Sehore Road Accident:
​Sehore Road Accident:Saamtv

भोपाळ: मध्यप्रदेशातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुलाचे मुंडन करुन पुन्हा घराकडे परतताना कार डिवायडरला धडकून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील सल्कानपूरच्या भैरव खोऱ्यात शुक्रवारी एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील छोट्या मुलाचे मुंडन करुन माघारी परतताना ही दुर्दैवी घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटून कार डिवायडरला धडकल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

भोपाळ येथील हे कुटुंब सल्कानपूर येथील बिजासन माता मंदिरात बाळाचे मुंडन करण्यासाठी गेले होते. मुंडन झाल्यानंतर हे कुटुंब तवेरा गाडीने परतत होते. यावेळी गाडीमध्ये चालकासह १२ जण होते. यावेळी भैरव घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट डिवायडरला धडकली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

​Sehore Road Accident:
Hingoli Accident News : हिंगोलीत भीषण अपघात, ट्रॅक्टरने दोघांना चिरडले; महिला गंभीर जखमी

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांसह दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​Sehore Road Accident:
Pune PDCC Bank: ब्रेकिंग! पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकाचे निलंबन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com