Boat Capsize: २९ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट धरणामध्ये बुडाली, चौघांचा मृत्यू; ११ जण बेपत्ता

Madhya Pradesh Boat Capsizes: मध्य प्रदेशमध्ये धरणामध्ये पर्यटकांची बोट बुडली. या बोटीमध्ये २९ प्रवासी होती. यामधील ४ जणांचा मृत्यू झाला तर १४ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. उर्वरीत ११ जण बेपत्ता आहेत.
Boat Capsize: २९ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट धरणामध्ये बुडाली, चौघांचा मृत्यू; ११ बेपत्ता
Madhya Pradesh Boat CapsizesSaam Tv
Published On

Summary -

  • मध्य प्रदेशमध्ये बरगी धरणात बोट बुडाल्याची घटना

  • २९ पर्यटक बोटीमध्ये होते

  • या दुर्घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण बेपत्ता

  • वादळी वाऱ्यामुळे बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती

मध्यप्रदेशमध्ये मोठी दुर्घटना घडली. जबलपूर येथे नर्मदा नदीवरील बरगी धरणामध्ये बोट बुडाली. या बोटीतून २९ पर्यटक प्रवास करत होते. या घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. १४ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले तर उर्वरीत ११ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.

पोलिस, एसडीआरएफ टीम आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. मोटर बोट आणि स्पीड बोटच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत होता. यावेळी बरगी धरणात लाटांमध्ये प्रवासी बोट अडकली. या वादळामुळे प्रवासी बोट उलटली.

Boat Capsize: २९ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट धरणामध्ये बुडाली, चौघांचा मृत्यू; ११ बेपत्ता
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी बरगी धरणातील खमारिया बेटाजवळ जोरदार वादळ आणि लाटांमुळे पर्यटकांनी भरलेली एक बोट बुडाली. बोटीमध्ये २९ लोक होते. बोट बुडाल्यानंतर १४ जण पोहत सुरक्षितरित्या धरणाबाहेर पडले. तर ४ जणांचा मृत्यू झाला. तर उर्वरीत पर्यटक बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे. या बोटीचा कॅप्टन महेश पटेल देखील बेपत्ता आहे. बचाव पथकाकडून त्याचा देखील शोध घेतला जात आहे.

Boat Capsize: २९ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट धरणामध्ये बुडाली, चौघांचा मृत्यू; ११ बेपत्ता
Accident News : भयंकर अपघात! देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

जबलपूरच्या बरगी धरणामध्ये बोट बुडाल्याचे वृत्त कळताच दिल्लीवरून आलेले मंत्री राकेश सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर सध्या १० रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. बचावकार्य करून वाचवण्यात आलेल्या पर्यटकांना आणि मृतांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात येत आहे.

Boat Capsize: २९ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट धरणामध्ये बुडाली, चौघांचा मृत्यू; ११ बेपत्ता
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

दरम्यान, बरगी धरण जबलपूरपासून सुमारे ३५ किमी अंतरावर नर्मदा नदीवर बांधण्यात आले आहे. ५१ वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण ७० मीटर उंच आणि ५.४ किमी लांब आहे. बरगी धरणाला २१ दरवाजे असून येथे वीज निर्मिती होते. येथे एमपी टुरिझमचे एक रिसॉर्ट असून वॉटर स्पोर्टची सोयही उपलब्ध आहे.

Boat Capsize: २९ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट धरणामध्ये बुडाली, चौघांचा मृत्यू; ११ बेपत्ता
Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com