32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रशासनात खळबळ; महापालिकांचे आयुक्त बदलले

IAS Transfer 32 Officers New Postings: मध्य प्रदेश सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल करत 32 IAS आणि 4 राज्य प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ग्वालियर आणि सतना महापालिकांना नवे आयुक्त मिळाले.
Madhya Pradesh IAS Reshuffle
Madhya Pradesh IAS Reshufflesaam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून देशात IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब आणि आता मध्यप्रदेशमध्ये 32 आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने गुरुवारी प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र प्रसिद्ध पत्रक काढत 32 IAS आणि 4 राज्य प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या नव्या जबाबदऱ्या दिल्या आहेत. या बदलीमध्ये महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपसचिव आणि एसडीएम स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Madhya Pradesh IAS Reshuffle
प्रशासनात मोठे फेरबदल! 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

ग्वालियर महापालिकेला नवे आयुक्त

2018 बॅचचे IAS अधिकारी अभिषेक चौधरी यांची धार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करत ग्वालियर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्वालियर महापालिकेचे विद्यमान आयुक्त संघ प्रिय यांची सिंगरौली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Madhya Pradesh IAS Reshuffle
मध्यरात्री 26 IAS अन् 53 RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठा भूकंप

सागर जिल्हा परिषदेतही बदल

IAS अधिकारी जगदीश कुमार गोमे यांची सिंगरौली जिल्हा परिषदेच्या CEO पदावरून बदली करून सागर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दतिया जिल्हा परिषदेचे CEO अक्षय कुमार तेम्रवाल यांची भोपाल महापालिकेत अपर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

Madhya Pradesh IAS Reshuffle
14 IAS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

संजना जैन जलसंसाधन विभागाच्या उपसचिव

मैहर येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संजना जैन यांची मध्य प्रदेश सरकारच्या जलसंसाधन विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवास जिल्हा परिषदेच्या CEO ज्योती शर्मा यांनाही उपसचिव करण्यात आले आहे. हरदा जिल्हा परिषदेच्या CEO अंजली जोसेफ जोनाथन यांची सार्वजनिक बांधकाम विभागात उपसचिव म्हणून कार्यभार देण्यात आला आहे.

नागार्जुन बी. गौडा यांच्याकडे सतना महापालिकेची जबाबदारी

2019 बॅचचे IAS अधिकारी डॉ. नागार्जुन बी. गौडा यांची खंडवा जिल्हा परिषदेच्या CEO पदावरून बदली करून सतना महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सतना स्मार्ट सिटीच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. खंडवा येथील अपर जिल्हाधिकारी रुची देशमुख गौडा यांची रीवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सागर जिल्हा परिषदेचे CEO विवेक केटी यांची जबलपूर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर अभिषेक सराफ यांची बालाघाट जिल्हा परिषदेवरून नगर प्रशासन आणि विकास विभागात अपर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com