Love Marriage Rules: लव्ह मॅरेजसाठी लागणार पालकांची परवानगी? नव्या कायद्यानं युवा पिढी टेन्शनमध्ये?

Love Marriage Rules: गुजरात सरकारने नवीन विवाह नोंदणी नियमांचा मसुदा सादर केला आहे. यात प्रेमविवाहांसाठी पालकांची संमती अनिवार्य असणार आहे. यामुळे आता प्रेमी युगुलांचं टेन्शन वाढणार आहे.
Love Marriage Rules:
Couples in Gujarat await clarity as government proposes new parental consent rules for love marriage registration.saan tv
Published On
Summary
  • विवाह नोंदणीसाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याचा मसुदा सादर.

  • प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये चिंता वाढली.

  • नियम अद्याप मसुदा टप्प्यात, अंतिम निर्णय बाकी.

आई-वडील प्रेमविवाहाला विरोध करतात. म्हणून अनेक जोडपी पळून जावून लग्न करतात. मात्र आता प्रेमी युगुलांचं टेन्शन वाढणार आहे.कारण लव्ह मॅरेजसाठी तरुण तरुणींना पालकांची परवानगी बंधनकारक असणार आहे. त्याबाबत नवा कायदा करण्यासाठी गुजरात सरकारने विवाह नोंदणी नियमांचा मसुदा सादर केलाय. मात्र या नव्या मसुद्यात काय आहे. पाहूयात.

Love Marriage Rules:
Shocking: विवाह संस्थेमार्फत प्रेम जुळलं, गर्लफ्रेंडनं केला बलात्काराचा आरोप, इंजिनियरने ट्रेनसमोर आयुष्य संपवलं

मेसेजद्वारे माहिती दिली जाईल.

लग्नाच्या अर्जानंतर लगेच मॅरेज प्रमाणपत्रं मिळणार नाही

अर्ज केल्याच्या 40 दिवसानंतर लग्नाचं प्रमाणपत्रं दिलं जाईल

त्यामुळे प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना कायदेशीर प्रक्रियेसोबत कुटुंबाच्या संमतीची अट घालण्यात आलीय.

पारदर्शकता आणि पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी गुजरात सरकारने पाऊल उचलल्याचा दावा केलाय.

Love Marriage Rules:
Valentine Day Love Letter: मैत्री जपता जपता प्रेमात पडलो मी; आयुष्यभराचे प्रेम जपून ठेवीन मी!

खरं तर घटनात्मकदृष्ट्या कलम 21 नुसार प्रेम विवाह करताना 18 वर्षापेक्षा जास्त वयाची मुलगी आणि 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाची संमती असेल तर त्यांना प्रेमविवाहापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यांना लग्नासाठी आई-वडील किंवा समाजाच्या परवानगीची गरज असणार नाही. असा निर्णय़ सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच दिलाय. मात्र आता गुजरात सरकार प्रेम विवाहासाठी आई-वडीलांची परवानगी बंधनकारक करण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र संविधानाच्या कसोटीवर हा कायदा टिकणार का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com